Russia Ukraine War Russia attacks Ukraine again 500 drones hit in one night
मॉस्को: रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवेंदिवस हिंसक रुप घेत आहे. १ जून रोजी युक्रेनने ‘ऑपरेशन स्पायडरबेव’च्या माध्यमातून रशियावर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात रशियाच्या बॉम्बर्सना लक्ष्य करण्यात आले. आता याच हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून रशियाने युक्रेनवर कारवाई सुरु केली आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवार हल्ला केला आहे. दरम्यान सोमवारी (९ जून) रशियाने तब्बल ५०० ड्रोन्स डागले आहेत. युक्रेनच्या सैन्याने रशियाने सोमवारी रात्री ड्रोन हल्ला केला. याशिवाय मिसाइल्स देखील युक्रेनवर डागण्यात आल्या.
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध थांबवण्यासाठी एकीकडे प्रयत्न केले जात आहेत. मात्र दुसरीकडे दोन्हीही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. युद्ध थांबवण्याचा एक भाग म्हणून सोमवारी दोन्ही देशांमध्ये युद्धकैद्यांच्या आणखी एका ग्रुपची देवाण-घेवाण करण्यात आली. मात्र, याच रात्री रशियाने आपल्यावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
हा हल्ला खरंतर युक्रेनच्या १ जूनच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जात आहे. युक्रेनने १ जून रोजी रशियावर १०० हून अधिक ड्रोन्सचा मारा केला होता. यामध्ये त्यांनी रशियाच्या अणु-सक्षम बॉम्बर्सना लक्ष्य केले. या ऑपरेशनला युक्रेनने स्पायडरवेब नाव देण्यात आले होते. रशियाच्या सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हे हल्ले – मरमंस्क, इरकुत्स्तक, इवानोव्हो, रियाजान आणि अमूर या पाच भागांमध्ये झाले. यातील केवळ मरमंस्क आणि इरकुत्स्क क्षेत्रात नुकसान झाले, तर बाकी ठिकाणचे हल्ले परतवून लावण्यात आले होते. युक्रेनच्या या कारवाईनंतर रशियामध्ये संतापाची लाट उसळली.
याच हल्ल्याचा बदला घेण्यास रशियाने सुरुवात केली आहे. रविवार ते सोमवार दरम्यान रशियाने युक्रेनवर सुमारे ५०० ड्रोन्स डागले आहेत. सोबतच विविध भागांमध्ये सुमारे २० मिसाईल्स मारा करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने युक्रेनच्या मध्य आणि पश्चिम भागातील शहरांना लक्ष्य करण्यात आले. यातील बहुतांश ड्रोन हल्ले परतवून लावण्यात आपल्याला यश आल्याचे युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे.
युक्रेनच्या वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रशियाचे २७७ ड्रोन्स आणि १९ मिसाईल्स अडवल्या आणि नष्ट केल्या आहेत. तसेच रशियाचे केवळ १० ड्रोन्स किंवा मिसाईल्स आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचल्याचा दावाही युक्रेनने केला आहे. या हल्ल्यात युक्रेनमधील एक व्यक्ती जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगतिले.
झेलेन्स्की आणि रशियन सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, की सोमवारी दोन्ही देशांमध्ये आणखी काही युद्धकैद्यांची अदला-बदली करण्यात आली. यामध्ये जखमी सैनिक आणि २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांचा समावेश होता. एकूणच रशिया-युक्रेनमध्ये युद्ध थांबवण्याबाबत दिवसा चर्चा होते, मात्र रात्री हे एकमेकांवर हल्ले करतात असं दिसत आहे. त्यामुळे या युद्धाला लवकर विराम मिळेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.