
america white house shooting
अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ गोळीबार; दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…
अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराती सहभागी असलेल्या संशयिताची अफगाण नागरिक रहमान उल्लाह लकनवाल अशी ओळख पटवण्यात आली आहे. त्याला सुरुक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताला राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या मेट्रो स्टेशनवरुन ताब्यात घेण्यात आले आहे. लकनवाल अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या सैनिकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. याला तातडीने प्रत्युत्तर देत सुरक्षा रक्षकांनी देखील हल्ला केला. यामध्ये हल्लेखोर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अमेरिकेन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रहमान उल्लाह लकनवाल हा अफगाण नागरिक आहे. तो २०११ मध्ये तालिबानन सत्ता हाती घेतल्यानंतर अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी आला होता. त्यावेळी हजारो अफगाण नागरिकांनी देश सोडला होता. यामध्ये हा लकनवाल देखील होता. त्याने अमेरिकेतील विशेष दलांमध्ये अफगाणिस्तानमध्ये १० वर्षे सेवा केली असल्याचे वृत्त आहे. अफगाण सोडल्यानंतर तो पत्नी आणि पाच मुलांसह अमेरिकेत स्थायिक झाला होता.
दरम्यान या घटनेनंतर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले असून याची योग्य तपासणीचे आदेश दिले आहे. तसेच त्यांनी या हल्ल्याचा आरोप बायडेन प्रशासनावर केला आहे. कारण बायडेन सरकारने कोणत्याही तपासणीशिवाय अमेरिकेत स्थलांतरितांना राहण्याची परवागी दिली. ही त्यांची मोठी चूक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मते, यामुळे सुरक्षा प्रक्रिया कमकुवत झाली आहे.
सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. लकनवाल याने सैनिकांवर हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय पूर्वी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या सैन्यात त्याने सेवा प्रदान केली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्याने केलेल्या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला मानसिक ताण, वैयक्कित वाद किंवा स्थलांतरितांना अचानक दिलेल्या चिथावणीमुळे करण्यात आला असण्याची शक्यता आहे. सध्या हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले जात आहे. या घटनेनंतर व्हाइट हाउसच्या परिसरात सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. जखमी सैनिकांवर रुग्णालयात उपतार सुरु आहे.