Russia-Ukraine War Ukraine Claims they shot down Russia's Su-35 fighter jet
कीव: रशिया-युक्रेन युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता रशियाला एक मोठा धक्का बसला आहे. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची चिंता वाढली आहे. युक्रेनच्या सेनेने त्यांनी रशियाचं Su-३५ हे लढाऊ विमान उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा पुतीन यांना मोठा धक्का मानला जात आहे.
युक्रेनच्या सेनेने टेलिग्राम मेसेंजवर याबाबत माहिती देण्यात आली. यात “आज, ७ जून २०२५ रोजी सकाळी, कुर्स्क दिशेला वायूसेनेचे एक यशस्वी अभियान पार पडले. यामध्ये रशियाच्या Su-३५ या लढाऊ विमानाला उद्ध्वस्त करण्यात आले.” असे म्हटले आहे. युक्रेनच्या या दाव्याची पुष्टी अद्याप रशियाने केलेली नाही. पण रशियाने याला नाकारही दिला नाही. रशियाने या वृत्तांवर अद्याप मौन पाळले आहे असून, त्यामुळेच युक्रेनचा दावा खरा असल्याचे म्हटले जात आहे.
सुखोई Su-३५ हे ४.५ पीढीचे मल्टीरोल लढाऊ विमान आहे. हे रशियाचे सर्वात हायटेक फायटर जेट मानले जाते. हे जेट Su-२७ विमानाच पुढच व्हर्जन आहे. यामध्ये एडव्हान्स एव्हियोनिक्स, थ्रस्ट व्हेक्टरिंग आणि AL-41F1S हे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये असणारे इरबिस-ई रडार हे तब्बल ४०० किलोमीटर दूर असणाऱ्या टार्गेटला ओळखू शकते. तसेच यामध्ये एअर-टू-एअर मिसाईल, गाईडेड बॉम्ब आणि अँटी शिप वेपन्स देखील आहेत.
हे फायटर प्लेन सध्या रशियाच्या हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अमेरिकेचे F-15 आणि युरोफायटर टायफून अशा लढाऊ विमानांना टक्कर देणारे हे विमान आहे. मात्र अशा पॉवरफुल फायटर विमानाला पाडल्याचा दावा युक्रेनने केल्यामुळे पुतीन यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
पुतीन यांच्या चिंतेचे कारण म्हणजे, त्यांनी सुखोई Su-15 हे लढाऊ विमान इतर देशांना निर्यात करण्याचा विचार केला आहे. अमेरिका-विरोधी देशांना हे विमान विकण्याचा त्यांचा मानस उघड आहे. एवढेच नव्हे, तर भारताला देखील या विमानाची ऑफर पुतीन यांनी दिली आहे. हे विमान बनवणाऱ्या सुखोई कंपनीने ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत भारतात याच्या निर्मितीला देखील होकार दिला आहे.
अशा वेळी युक्रेनसारख्या छोट्या देशाने या विमानाला उद्ध्वस्त करण्याची बातमी ही पुतीन यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण यामुळे रशियाच्या वायुसेनेला भगदाड पडेलच, मात्र सोबतच निर्यात थांबल्यास त्यांना मोठा आर्थिक फटकाही बसणार आहे.