Russia Ukraine War Ukraine's attacks on Russia target oil factories
Russia Ukraine War : मॉस्को : गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War ) युद्धाने आता रौद्र रुप धारण केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ला करत आहे. आता युक्रेनने देखील रशियावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी (०३ ऑगस्ट) युक्रेनने रशियाच्या तेल कारखान्यावर हल्ला केला आहे. सोची शहरातील तेल डेपोला ड्रोनने लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे तेल कारखान्याला भीषण आग लागली.
घटनेची माहिती मिळताच १२० हून अधिक अग्निशमन गलाचे कर्माचारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर तातडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तेल कारखान्यातून धूराचे लोळ बाहेर निघताना दिसत आहे. रशियाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर त्यांच्या नागरी विमान वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. काही काळासाठी सोची विमानतळावरील विमान वाहूतक सेवा थांबवण्यात आली होती.
युक्रेन युद्धात भारत करत आहे रशियाची गुप्त मदत? डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा गंभीर आरोप
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (०२ ऑगस्ट) रात्री युक्रेनने त्यांच्या तेल कारखान्यावर हल्ले सुरु केले होते. हे हल्ले रविवारी (०३ ऑगस्ट) सकाळपर्यंत चालले. युक्रेनने रशिया आणि ब्लॅक सीच्या दिशेन ९३ ड्रोन हल्ले केले. मात्र रशियाने हे ड्रोन हल्ले पाडले असल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात रशियाच्या वोरोनेज भागात चार जण जखमी झाल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
युक्रेनवरही हल्ले सुरुच
याच वेळी रशियाचे युक्रेनवरही ड्रोन हल्ले सुरुच आहेतय युक्रेनच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने शनिवारी रात्री ७६ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. यापूर्वी रशियाने ३१ जुलै रोजी हल्ला केला होता. यामध्ये युक्रेनचे ३१ नागरिक ठार झाले होते. यामध्ये ५ लहान मुलांचा देखील समावेश होता. तसेच १५० हून अधक लोक जखमी झाले होते.
ट्रम्प यांचा रशियाला शांतता चर्चेचा इशारा
याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला शांतता चर्चेचा इशारा दिला आहे. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ८ ऑगस्टपर्यंत वाटाघाटासाठी युक्रेनसबत चर्चा करण्याचे म्हटले आहे. असे न केल्यास रशियावर नवीन निर्बंध लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. सध्या या युद्धाने तीव्र रुप धारण केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झालेआहे.
येमेनमध्ये भीषण सुमद्री दुर्घटना ; किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने ६० हून अधिक लोकांचा मृत्यू