Russia-Ukraine War Ukraine's killed more than three thousand soldiers in 72 hours
क्वीव: एकीकडे यूक्रेन शांततेसाठी युद्धबंदीचा प्रस्ताव सादर करत आहे, तर दुसरीकडे रशियाच्या सैन्यानवर हल्ला सुरुच ठेवला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सैन्य कुर्स्कवर पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याचदरम्यान यूक्रेनियन लष्कराने रशियाने सैनिकांवर हल्ला करण्यात व्यस्त आहेतो. गेल्या 72 तासांता रशियाचे 3 हजाराहून अधिक सैनिक मारले गेले आहेत. यूक्रेनने 11 मारच रोजी केलेल्या हल्ल्यात 1300, 12 मार्च रोजी 1430 आणि 13 मार्च म्हणजे आज केलेल्या हल्ल्यात 1200 रशियन सैनिकांचा खात्मा केला आहे.
अमेरिकेने दाखवला हिरवा कंदील
व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्कींच्या वादानंतर अमेरिकेने यूक्रेनला गुप्तचर माहिती देण्यास नकार दिला होता. यामुळे यूक्रेन माहितीच्या अभावामुळे रशियावर हल्ला करु शकला नाही. दरम्यान पुन्हा एकदा अमेरिकेने यूक्रेनला गुप्तचर माहिती मिळवून दिली आहे. ही माहिती मिळताच यूक्रेन सैन्य दर तासाला 55 रशियन सैनिकांची हत्या करत आहे.
शिवाय यूक्रेनने गेल्या 3 दिवसांत 15 रशियन टॅंकही नष्ट केले आहेत. झेलेन्स्की रशियाच्या तोफखाना आणि रणगाडे नष्ट करम्यावर लक्ष्य केंद्रित करत आहे. यूक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युद्धात आतापर्यंत 8 लाखाहून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. मात्र रशियाने अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी जारी केलेली नाही.
युद्धबंदीसाठी रशियाच्या अटी
दुसरीकडे रशियाने युद्धबंदीला मान्यता देण्यासाठी अमेरिकेसमोर चार अटी ठेवल्या आहेत. यामध्ये यूक्रेनला नाटो सदस्यत्व न देणे, तसेच रशियाविरुद्ध कोणतेही आंतरराष्ट्रीय सैन्य गट यूक्रेनमध्ये आपले लष्कर तैनात न करणे, रशियाने ताबा मिळवलेल्या क्रीमीया, डोनेत्स्क, लुहान्स्क, झापोरिझ्झिया आणि खेरसॉन या चार भांगाना आंतरराष्ट्रीय मान्यता देणे आणि नाटोचा विस्तार थांबवणे या अटी ठेवल्या आहेत. यामुळे अमेरिकेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. रशियाच्या या अटी अमेरिका आणि नाटो देशांना धोका निर्माण करणाऱ्या, तसेच अमेरिका आणि युरोपीय देशांत वाद निर्माण करणाऱ्या असल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिका दोन भागात दुभागला
एकीकडे रशियाच्या युद्धबंदीसाठी अटी आणि कुर्स्कवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि यूक्रेनचा रशियावरील हल्ला यामुळे युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. तज्ज्ञांच्या मते दोन्ही देश शांतता चर्चेचे नाटक करत असून त्यांचा हेतू मात्र वेगळा आहे. यामुळे सर्वात जास्त नुकसान अमेरिकेचे होत असल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिका सध्या दोन भागात विभागला गेला आहे, एक म्हणजे रशिया-यूक्रेन युद्धबंदी आणि दुसरी म्हणजे अमेरिका-रशिया संबंध पुन्हा रुळावर आणणे. मात्र रशियाच्या अटी केवळ यूक्रेनपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या अमेरिका आणि युरोपच्या रणनीतीवरही परिणाम करू शकतात.