Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला मोठा दिलासा; अमेरिका पुन्हा करणार एक अब्ज डॉलर्सची मदत

अमेरिका पुन्हा एकदा युक्रेनच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी जाहीर केले आहे की, युक्रेनला जवळपास एक अब्ज डॉलर्सची अतिरिक्त मदत दिली जाईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 08, 2024 | 03:30 PM
रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला मोठा दिलासा; अमेरिका पुन्हा करणार एक अब्ज डॉलर्सची मदत

रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला मोठा दिलासा; अमेरिका पुन्हा करणार एक अब्ज डॉलर्सची मदत

Follow Us
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिका पुन्हा एकदा युक्रेनच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी जाहीर केले आहे की, युक्रेनला जवळपास एक अब्ज डॉलर्सची अतिरिक्त मदत दिली जाईल. ही मदत अमेरिका काँग्रेसद्वारे मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर करून बायडेन प्रशासनाने युद्धग्रस्त युक्रेनला अधिक सक्षम करण्याच्या हेतूने दिली जाणार आहे. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी ही रक्कम खर्च करण्यावर भर दिला जात आहे.

यूक्रेनला शस्त्रांची तातडीची गरज

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनला या नवीन मदतीत ‘हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम’ (HIMARS), ड्रोन आणि युद्धसाहित्यही पुरवले जाणार आहे. या शस्त्रास्त्रांची युक्रेनला सध्या खूप गरज आहे. ही मदत ‘युक्रेन सिक्युरिटी असिस्टन्स इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून दिली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे पुरवले जाणारे शस्त्रसामान युक्रेनच्या लष्करी क्षमतेला दीर्घकालीन बळकटी देण्यास उपयुक्त ठरते. यामुळे युद्धाच्या बूमीवर तातडीने बदल घडत नसला तरी, भविष्यातील सुरक्षेसाठी ही मदत महत्त्वाची ठरते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग प्रस्ताव अयशस्वी; विरोधकांकडे फक्त 192 मतं

अमेरिका याआधीही मदत केली होती

अमेरिकेने युक्रेनला, 2022च्या रशियाच्या आक्रमणानंतर62 डॉलर्सची लष्करी मदत केली होती. ऑस्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मदत देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्याचवेळी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील पुढील प्रशासन युक्रेनला सैनिकी मदत सुरू ठेवेल का, याबाबत विचारले असता, ऑस्टिन म्हणाले की, “सध्याच्या प्रशासनाने हा निर्णय स्वबळावर घेतला आहे. पुढील प्रशासन मदत सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला जाईल.”

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांची नवीन योजना

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. हे दीर्घकाळ चालणारे युद्ध थांबवणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी एक नवीन योजना आखली आहे. ट्रम्प यांनी निवृत्त जनरल किथ केलॉग यांची रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.

आता रशिया-युक्रेन युद्धावरील विशेष दूत या नात्याने दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध संपविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात युक्रेन युद्ध संपवण्याची घोषणा केली होती, ती पूर्ण करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी कीथ केलॉग यांच्यावर सोपवली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशिया आणि बेलारुसच्या ‘या’ करारामुळे युक्रेनला धोका वाढणार; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर…

Web Title: Russia ukraine war us announced 1 billion in new military aid to ukraine nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • America
  • Russia
  • ukraine
  • world

संबंधित बातम्या

Shivali Parab: अमेरिकेत फिरतेय शिवाली परब; गुलाबी फ्रॉकमधील क्यूट लूक पाहून चाहते घायाळ!
1

Shivali Parab: अमेरिकेत फिरतेय शिवाली परब; गुलाबी फ्रॉकमधील क्यूट लूक पाहून चाहते घायाळ!

US Iran war : इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी?
2

US Iran war : इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी?

Brazil Election: ‘मीच ब्राझीलचा खरा नेता, निवडणुकीत हेराफेरी झाली’ अमेरिकेत पोहोचताच फ्लॅव्हिओ बोल्सोनारो यांचा खळबळजनक दावा
3

Brazil Election: ‘मीच ब्राझीलचा खरा नेता, निवडणुकीत हेराफेरी झाली’ अमेरिकेत पोहोचताच फ्लॅव्हिओ बोल्सोनारो यांचा खळबळजनक दावा

US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की काय घडले?
4

US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.