
Russia Ukraine War
राकेश शिक्षणासाठी रशियामध्ये गेला होता, परंतु युद्धभूमीवर त्याचा शेवट झाला. ही बाबा त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. ३० वर्षीय राकेश हा व्हिसा स्टुडंटवर रशियाला गेला होता. तुमच्या आमच्या प्रमाणे परदेशात जाभन शिक्षण घेण्याचे आणि भविष्य घडवण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र नियतीने त्याच्यावर घात केला.
कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, रशियात पोहोचल्यानतर राकेशचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करण्यात आला होता. त्याला जबरदस्तीने सैन्यात भरती करण्यात आले. यानंतर त्याला रशिया आणि युक्रेन युद्धभूमीवर पाठवण्यात आले. या युद्धात त्याचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबीयांवर दु:ख;चा डोंग कोसळला आहे. त्याच्या रहिवाशी गावात देखील शोककळा पसरली आहे.
कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार, राकेशसोबत त्यांचाय शेवटचा संपर्क हा ३० ऑगस्ट २०२५ रोजी झाला होता. यावेळी त्याला लष्करी प्रशिक्षण दिले जात असल्याचे आणि त्याला युद्धात पाठवले जाणार असल्याचे त्याने कुटुंबाकडे भीती व्यक्त केली होती. यानंतर त्याचा कुटुंबाशी कोणताही संपूर्क झाला नाही.
यानंतर मुलाच्या काळजीने राकेशचे वडिल राज बहादूर मौर्य यांनी दिल्ली गाठली. त्यांनी भारत सरकारकडे मदत मागितली. विविध अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेत राकेशला परत सुरक्षित आणण्याची विनंती त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी राकेशला लवकरच भारतात परत आणण्याचे आश्वसन दिले. परंतु दहा दिवसांपूर्वी कुटुंबाला राकेशच्या मृत्यूची माहिती मिळाली. राकेश रशिया युक्रेन युद्धात शहीद झाला असल्याचे त्यांना समजले.
या बातमीने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. १७ डिसेंबर रोजी राकेशचा मृतदेह उत्तराखंडमध्ये आणण्यात आला असून त्याच्यावर आज शक्तीफार्म येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. राकेशच्या निझनापुन्हा पुन्हा एकदा परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय तरुणांचा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
Ans: राकेश शिक्षणासाठी रशियामध्ये गेला होता, परंतु युद्धभूमीवर त्याचा शेवट झाला.
Ans: राकेशला त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करुन युक्रेन युद्धात पाठवण्यात आले होते, तेथे त्याचा मृत्यू झाला.
Ans: मुलाच्या काळजीने राकेशचे वडिल राज बहादूर मौर्य आणि त्याचे कुटुंबीयांनी दिल्ली सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याला पर आणण्याची विनंती केली.