मैत्री की दगाबाजी? इकडे एर्दोगान-पुतिन भेट अन् तिकडे ब्लॅक सीमध्ये खळबळ; रशियाचा तुर्की जहाजावर हल्ला, VIDEO
नुकतेच शुक्रवारी (१२ डिसेंबर) तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे भेट झाली होती. येथे एका आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास फोरम चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रशिया आणि तुर्कीच्या अध्यक्षांनी द्विपक्षीय बैठक घेतली होती.
दरम्यान हा हल्ला तुर्कीच्या युक्रेनला सततच्या मदतीमुळे करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. तुर्कीने रशिया युक्रेन युद्धात कीवर सतत मदत केली आहे. यामुळे रशियाने तुर्कीला धडा शिकवण्यासाठी हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. रशियन सैन्याने क्षेपणास्त्रे तुर्कीच्या जहाजाला उडवले आहे.
युक्रेनसाठी पॉवर जनरेटर घेऊन निघाले होते जहाज
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीचे हे मालवाहू जहाज रशियाविरुद्ध युक्रेनला मदत करत होते. हे जहाज युक्रेनसाठी पॉवर जनरेटर घेऊन निघाले होते. रशियाने युक्रेनच्या अनेक पायाभूत उर्जा सुविधा नष्ट केल्या आहेत. यामुळे युक्रेनन पॉवर प्लांट्स आणि इतर काही उर्जा संसाधने तुर्कीकडून मागवली होती. परंतु रशियाने तुर्कीच्या या जहाजावर हल्ला केला आहे. रशियाने (Russia) या हल्ल्यानंतर जो कोणी रशियाला नुकसान पोहोचवण्याचे काम करेल त्याला मोठी किंमत मोजावी लागले अशी घोषणा केली आहे. रशियाच्या या घोषणेतून स्पष्ट दिसून येते की इतर देशांना युक्रेनला मदत करण्यापासून रोखले जात आहे.
दरम्यान या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जहाज आगच्या ज्वाळांनी लपेटलेले असून बुडत असताना दिसत आहे. दरम्यान या हल्ल्यानंतप तुर्कीने संतप्त प्रतिक्रिया देखील दिली आहे.
तुर्कीची प्रतिक्रिया
ब्लॅक सीमध्ये रशियाने तुर्कीच्या जहाजांना लक्ष्य केले आहे. हे जहाज तुर्कीचे एक मालवाहू जहाज होते. दरम्यान तुर्कीने रशियाच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. रशियाच्या या हल्ल्याला बेकयादेशीर आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन म्हणून रशियाने संबोधले आहे.
🚨⚡️BREAKING AND UNUSUAL The first strict Russian response to Turkey after allowing Ukrainians to target Russian ships in the Black Sea: The Turkish cargo ship Cenk RoRo, which was carrying electric generators (AKSA), was subjected to ballistic missile strikes in the Ukrainian… pic.twitter.com/Bd66GizrWK — RussiaNews 🇷🇺 (@mog_russEN) December 12, 2025






