Russia Ukraine War Update Russia attack on Ukraine's capital kyiv
कीव: बुधवारी (23 एप्रिल) रात्री रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मोठा हल्ला केला आहे. रशियाने कीववर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यात किमान 8 जणांचा मृत्यू आणि 70 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे युक्रेनला धक्का बसाल आहे. तसेच अनेक तज्ज्ञांनकडून पुतिन यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागचे कारण म्हणजेच काही दिवसांपूर्वी स्वत: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनसोमर शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडला होता.
यामुळे या हल्ल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात अनेक इमारतींना आग लागली आहे. यामध्ये लहान मुले देखील जखमी झाले आहेत. तसेच अनेक लोक मलब्याखाली अडकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने युक्रेनवर 70 क्षेपणास्त्रे डागली तर 145 ड्रोन हल्ले केले आहेत.
यामध्ये युक्रेनच्या राजधानी कीवला लक्ष करण्यात आले आहे. युक्रेनच्या अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियाला युद्धबंदी नको असून याचा उद्देश अमेरिकेवर दबाव आणणे आहे. सध्या हल्ल्याच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. कीवमध्ये निवासी इमारती आणि सार्वजनित पायाभूत सुविधांना लक्ष करण्यात आले आहे.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे की, या हल्ल्यांवरुन दिसून येते की रशिया शांतता चर्चांमध्ये अडथळा आणक आहे. तसेच कीवचे महापौरांनी म्हटेल आहे की, रशियाचा या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
Very clear words from my Latvian colleague and friend @Braze_Baiba. Russia must be forced to peace. Ukraine must be stengthened to protect itself. Grateful to Latvia for its strategic vision and readiness to step up support for Ukraine. https://t.co/C1Ut8Ofmn5
— Andrii Sybiha 🇺🇦 (@andrii_sybiha) April 24, 2025
दरम्यान रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, या हल्ल्याचा उद्दिष्ट युक्रेनच्या विमान वाहतूक, क्षेपणास्त्र आणि अंतराळ, तसेच यांत्रिक अभियांत्रिकी आणि चिलखती उद्योग, रॉकेट इंधन आणि दारुगोळा उत्पादन सुविधा नष्ट करायच्या होत्या. हल्ल्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या कीववरील हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशियाच्या या हल्ल्यामुळे मी खूश नाही. हा हल्ला आवश्यक नव्ता आणि खरोखरच वाईट आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, पुतिन थांबा! दर आठवड्याला 5 हजार सैनिक मारले जात आहे. शांतता करारावर चर्चा करुया.