१. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला
२. भारत-रशियाच्या मैत्रीवर अमेरिका नाराज
३. व्लादिमिर पुतीन भारत दौऱ्यावर येणार
India Vs Russia: सध्या अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. २७ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे म्हटले जात आहे. भारत आणि रशियाच्या मैत्रीवरून अमेरिका नाराज असल्याचे म्हटले जात आहे. भारत रशियाशी जास्त व्यापार करतो म्हणून ट्रम्प नाराज आहे. त्यामुळे भारतावर ५० टक्के तारीफ लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान टाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याचे समजते आहे.
सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले. मात्र पुतीन हे कधी भारतात येणार हे अधिकृत समोर आलेले नाही. व्लादिमिर पुतीन हे वर्षाअखेरीस भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
Putin’s India visit date finalised – NSA Ajit Doval Sir pic.twitter.com/xbeYdR0dk5
— Lakshay Mehta (@lakshaymehta31) August 7, 2025
भारत आणि रशियाचे चांगले संबंध आहेत. हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. आमच्यात उच्चस्तरीय संवाद सातत्याने होत असतो. यामुळे आमची मैत्री घट्ट आहे. राष्ट्रपती पुतीन यांच्या भारत भेटीसाठी आम्ही उत्सुक आहोत, असे अजित डोभाल यांनी सांगितले.
ट्रम्पचा धडाका सुरूच; आता भारतावर २५ नव्हे तर ५० टक्के Tariff
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. रशियाशी असलेल्या मैत्रीवरून ट्रम्प भारतावर नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे त्यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला होता. मात्र आता त्यांनी हा निणर्य बदलला असून अजून जास्त टॅरिफ लावण्याचा अमेरिकेने भारतावर आता ५० टक्के टॅरिफ लावला आहे.
भारत रशियन तेलाची सातत्याने खरेदी करत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेने या आधी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला होता. मात्र आता अमेरिकेने हा कर २५ वरून ५० टक्क्यांवर नेला आहे. आता ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लावला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
India Vs Trump: मोठी बातमी! ट्रम्पचा धडाका सुरूच; आता भारतावर २५ नव्हे तर ५० टक्के Tariff लावला
अमेरिकेने लादलेला हा अतिरिक्त कर २१ दिवसांनी लागू होणार आहे. साधारणतः २७ ऑगस्टपासून हा कर लागू होणार आहे. ट्रम्प यांनी काही तासांपूर्वीच भारताला कर वाढवण्याची धमकी दिली होती. २४ तासांमध्येच अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारत काय निर्णय घेणार किंवा भारताची भूमिका काय असणार हे पाहावे लागणार आहे.