Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाची मोठी खेळी! गाझा ‘Board Of Peace’ साठी १ अब्ज डॉलर्स देणार, पण…; पुतिन यांनी ट्रम्पसमोर ठेवली मोठी अट

Russia on Gaza Board Of Peace : व्लादिमिर पुतिन यांनी एक मोठा डाव खेळला आहे. ट्रम्प यांच्या गाझा बोर्ड ऑफ पीस समितीला १ अब्ज डॉलर्स निधी देण्यास तयारी दर्शवली आहे, परंतु त्यांनी एक मोठी अट ठेवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 22, 2026 | 02:57 PM
Iran-Israel War : इराण-इस्रायलमधील युद्ध थांबवण्यासाठी रशिया करणार सहकार्य; व्लादिमीर पुतिन म्हणाले...

Iran-Israel War : इराण-इस्रायलमधील युद्ध थांबवण्यासाठी रशिया करणार सहकार्य; व्लादिमीर पुतिन म्हणाले...

Follow Us
Follow Us:
  • गाझा Board Of Peace साठी पुतिन देणार १ अब्ज डॉलरचा निधी
  • पण, डोनाल्ड ट्रम्पसमोर ठेवली ही मोठी अट
  • जाणून घ्या काय आहे रशियाचा डाव?
Putin on Gaza Peace of Board : मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात गाझा (Gaza) युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रस्ताव मांडला आहे. पुतिन यांनी रशिया गाझा बोर्ड ऑफ पीसला १ अब्ज डॉलर्स निधी देण्याचे मान्य केले आहे. परंतु हा निधी रशियाने नव्हे, तर अमेरिकेने जप्त केलेल्या रशियाच्या संपत्तीतून देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे आतंरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

गाझा युद्धाचा शेवट होणार? ट्रम्प यांच्या Board of Peace मध्ये ८ मुस्लिम देशांची एन्ट्री; पुतिन देणार साथ?

काय आहे पुतिन यांची अट?

अमेरिकेकडे सध्या रशियाची ४ ते ५ अब्ज डॉलर्सची संपत्ती जप्त केलेली आहे. तर जगभरात सुमारे ३०० अब्ज डॉलर्स किंमतीची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. तर बहुतांशी संपत्ती ही युरोपध्ये अडकेलेली आहे. यामुळे पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ही संपत्ती गाझात पुनर्बांधणीसाठी, तसेच शहरांचे पुनरुज्जीवन, पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळित करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पण ही संपत्ती रशिया आणि युक्रेन मध्ये शांतता करार झाल्यानंतर वापरता येईल अशी अट रशियाने ठेवली आहे. रशियाच्या या अटीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

पुतिन यांनी हेही सांगितले की, यावर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून मॉस्कोत ट्रम्पचे राजदूत स्टीव्ह वीटकॉप आणि जॅरेड कुश्नर यांच्या पुढील चर्चा होणार आहे. पुतिन यांनी पॅलेस्टिनींशी रशियाच्या असलेल्या ऐतिहासिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय अमेरिकेच्या फायदाचा ठरण्याची अधिक शक्यता आहे, तर रशियावर आणकी निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

शिवाय रशिया युक्रेनमधील संघर्षाला (Russia Ukraine War) दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अद्यापही यावर शांतता करार झालेला नाही, यामुळे दोन्ही देशांत पुन्हा युद्धबंदी लागू होईल याची शक्यता अत्यंत कमी आहे. शिवाय ट्रम्प यांनी गाझात २०२७ पर्यंत मंडळ स्थापन करुन पुनर्बांधणी प्रक्रिया करायची आहे. यामुळे युद्धबंदी झाल्यानंतर गोठवलेीली संपत्ती अनेक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच वापरता येणार आहे.

काय आहे बोर्ड ऑफ पीस ?

गाझात सध्या इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी लागू आहे. दोन्ही गटांतील युद्धबंदीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सध्या यातील दुसऱ्या टप्प्यावर चर्चा सुरु आहे. तर तिसऱ्या टप्प्यात गाझात पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीस समिती स्थापना केली आहे. ही समिती गाझात सरकार स्थापन करणे, पुनर्बांधणीची प्रक्रियी सुरु करणे आणि आर्थिक विकास सुनिश्चित करण्यावर देखरेख ठेवणार आहे.

ट्रम्पचा Gaza Peace Plan अपयशी? फ्रान्सने बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील होण्यास दिला नकार, म्हणाले…

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाने गाझा बोर्ड ऑफ पीसला निधी देण्यासाठी कोणता प्रस्ताव मांडला आहे?

    Ans: पुतिन यांनी अमेरिकेने जप्त केलेली रशियाची संपत्ती गाझाच्या पुनर्बांधणीसाठी वापरावी असा प्रस्ताव मांडला आहे.

  • Que: पुतिन यांनी ट्रम्पसमोर कोणती अट ठेवली आहे?

    Ans: पुतिन यांनी अमेरिकेने जप्त केलेली रशियाची संपत्ती गाझाच्या पुनर्बांधणीसाठी वापरावी असे म्हटले आहे, परंतु ही संपत्ती वापरण्यासाठी रशिया युक्रेनमध्ये शांतता करार आवश्यक आहे.

Web Title: Russia will give 1 billion dollars for board of peace putin puts a big condition donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Gaza
  • Israel Hamas War
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.