Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran चा सुप्रीम नेता Mojtaba Khamenei आहे कुठे? रशियाच्या राजदुताने उलगडले रहस्य, Donald Trump ला बसणार धक्का

इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की इराणचे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी, कुठे आहेत? त्यांची विधाने येत असून ते दिसत नाहीत, ते जिवंत आहेत की नाही, हे एक गूढच आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 01, 2026 | 11:12 AM
मोजबता खामेनी नक्की आहे कुठे (फोटो सौजन्य - Instagram, iStock)

मोजबता खामेनी नक्की आहे कुठे (फोटो सौजन्य - Instagram, iStock)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पला बसू शकतो धक्का 
  • मोजतबा खामेनेई जिवंत आहे की नाही
  • रशियन राजदुताने उलगडले रहस्य  
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला सुरुवात होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धाने संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरला आहे, पण सर्वात मोठे गूढ कायम आहे ते म्हणजे इराणचे नवे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनेई नक्की कुठे आहेत?

मोजतबा खामेनी यांनी इराणची सूत्रे हाती घेतल्यापासून, जगाने त्यांना अद्याप सार्वजनिकरित्या पाहिलेले नाही. त्यांनी अमेरिकेला इशारा देणारी अनेक निवेदने आणि संदेश जारी केले असले तरी, ते स्वतः सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. युद्धाच्या या नाजूक टप्प्यावर देशाच्या सर्वात प्रमुख नेत्याच्या सार्वजनिक अनुपस्थितीमुळे अनेक तर्कवितर्कांना वाव मिळाला आहे.

India Iran Oil: संकट टळले! इराण-भारत तेल व्यापार पुन्हा सुरू; खारग बेटावरून 6,00,000 बॅरल कच्चे तेल घेऊन येणारा टँकर तयार

मोठा प्रश्न झाला निर्माण

इराण युद्धाच्या दुसऱ्या महिन्यात, एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, नवे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी कुठे आहेत? त्यांनी काही निवेदने जारी केली असली तरी, ते सार्वजनिकरित्या कुठेही दिसलेले नाहीत. परिणामी, त्यांच्या स्थितीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, इराणमधील रशियन राजदूत अलेक्सी देदोव यांनी याचा खुलासा केला आणि सांगितले की, मोजतबा खामेनेई हे इराणमध्येच आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसणे टाळत आहेत. त्यांनी हेही स्पष्ट केले की ते उपचारांसाठी परदेशात गेलेले नाहीत.

मोजतबा खामेनी रशियात आहेत का?

गेल्या काही दिवसांपासून अशी जोरदार चर्चा होती की, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रशियामध्ये उपचार सुरू आहेत. पण आता रशियाने या वृत्तांवर मौन सोडले आहे. स्थानिक माध्यमांशी बोलताना, इराणमधील रशियन राजदूतांनी स्पष्ट केले की मोजतबा खामेनी रशियात नसून इराणमध्ये आहेत.

रशियन राजदूत म्हणाले, “मोजतबा खामेनेई हे देशात (इराणमध्ये) उपस्थित आहेत, परंतु काही वैध कारणांमुळे ते सध्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसणे टाळत आहेत.” तथापि, त्यांनी त्या कारणांबद्दल अधिक तपशील दिला नाही.

या घडामोडींची सुरुवात कशी झाली?

२८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या संघर्षादरम्यान झालेल्या हल्ल्यात त्यांचे वडील, माजी सर्वोच्च नेते अली खामेनी, मारले गेल्यानंतर मोजतबा खामेनी यांनी इराणचे नेतृत्व स्वीकारले. वडिलांच्या मृत्यूनंतर मोजतबा यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले, परंतु तेव्हापासून त्यांचे कोणतेही नवीन फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेले नाहीत.

अमेरिका आणि ट्रम्प यांचे दावे

अमेरिकेनेही इराणच्या गूढ वर्तनावर टीका केली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचा दावा आहे की, या हल्ल्यांमध्ये सर्वोच्च नेते गंभीर जखमी झाले असून त्यांचे रूप विद्रूप झाले असावे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अनेक प्रसंगी असेही म्हटले आहे की, मोजतबा खामेनी या हल्ल्यांमधून वाचले नसावेत आणि मारले गेले असावेत.

Iran-US War : युद्धाचा फक्त इराण-अमेरिकेवर नाही, तर जगावर होणार परिणाम; तेलाची टंचाई, महागाईसारखी भीषण परिस्थिती उद्भवणार

Web Title: Russian envoy shared update about iran supreme leader mojtaba khamenei amid middle east iran us war donald trump may shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Mojtaba Khamenei
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा
1

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
2

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
3

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
4

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.