Russian jets entered US airspace but were repelled by the US and Canada heightening US-Russia tensions
रशियन लढाऊ विमाने आणि बॉम्बर्सनी अलास्काच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकन व कॅनेडियन हवाई दलाने तत्काळ प्रतिसाद देत F-16 विमाने तैनात करून रशियन विमानांना मागे हटवले.
युरोपमध्ये रशियन लढाऊ विमाने व ड्रोनच्या घुसखोरीच्या घटनांमुळे नाटो देशांमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे.
Russian jets airspace breach : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया( Russia)आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी पोलंड, रोमानिया, एस्टोनिया यांसारख्या नाटो देशांमध्ये रशियन लढाऊ विमानांनी आणि ड्रोननी घुसखोरी करून खळबळ माजवली होती. आता हीच भीती अमेरिकेतही प्रत्यक्ष उतरली आहे. बुधवारी रशियन हवाई दलाने दोन Tu-95 हेवी बॉम्बर्स आणि दोन Su-35 लढाऊ विमाने(Su-35 fighter jets) घेऊन अलास्काच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात (Air Defence Identification Zone – ADIZ) प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या NORAD (North American Aerospace Defense Command) या संयुक्त हवाई संरक्षण यंत्रणेने त्वरित सजगता दाखवत प्रतिसाद दिला. अमेरिकन F-16 लढाऊ विमाने, E-3 अर्ली वॉर्निंग विमान आणि KC-135 टँकर तत्काळ तैनात करण्यात आले. NORAD च्या मते, या कारवाईदरम्यान रशियन विमानांना मागे हटवण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America News : 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊनची शक्यता; ट्रम्प यांच्या गुंतवणुकीच्या दाव्यानंतर नवा राजकीय कलह
अमेरिकेने नंतर स्पष्ट केले की, रशियन विमानांनी अमेरिकेच्या किंवा कॅनडाच्या सार्वभौम हवाई क्षेत्रात थेट प्रवेश केला नाही. ती विमाने केवळ ADIZ या बाहेरील संरक्षण वर्तुळात फिरली. पण हीच गोष्ट चिंताजनक ठरते. कारण, एखाद्या देशाच्या सार्वभौम हद्दीवर हल्ला करण्याआधी शत्रू विमाने नेहमीच या बाहेरील पट्ट्यात चाचपणी करतात. त्यामुळे अमेरिका आणि नाटो यांना याचे गांभीर्याने विश्लेषण करावे लागणार आहे.
अलास्का हे अमेरिकेचे उत्तर ध्रुवाजवळचे महत्त्वाचे राज्य. येथून रशियाची हद्द फार दूर नाही. याच कारणामुळे अलास्का हा अमेरिकेच्या हवाई संरक्षणासाठी अत्यंत संवेदनशील पट्टा मानला जातो. याठिकाणी रशियन बॉम्बर्स व लढाऊ विमाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतील, तर तो केवळ “नियमित” सराव नसून अमेरिका आणि नाटोवर दबाव टाकण्याचा स्पष्ट संदेश आहे, असे लष्करी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फक्त अमेरिका नव्हे तर युरोपातील अनेक देश रशियन हालचालींनी त्रस्त झाले आहेत. मागील आठवड्यात पोलंड, रोमानिया, एस्टोनिया यांसारख्या नाटो सदस्यांच्या हवाई क्षेत्रात रशियन विमाने व ड्रोन फिरताना आढळली. डेन्मार्कने तर उघडपणे रशियावर आरोप केला की, त्यांच्या विमानतळांवर संशयास्पद ड्रोन दिसले ज्यामुळे राजधानी कोपनहेगनमधील मुख्य विमानतळ काही वेळ बंद करावा लागला. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी ही घटना “आमच्या पायाभूत सुविधांवरील सर्वात गंभीर हल्ला” असे वर्णन केले.
अमेरिकन हवाई दलाने या घुसखोरीबाबत स्पष्ट केले,
“रशियन विमाने आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत राहिली, त्यांनी अमेरिका किंवा कॅनडाच्या सार्वभौम हवाई हद्दीत प्रवेश केला नाही. अशा हालचाली अलास्काच्या ADIZ मध्ये नियमितपणे घडतात. त्याला थेट धोका मानले जात नाही, पण आम्ही सजग राहणे आवश्यक आहे.”
हे विधान अमेरिकेच्या संतुलित भूमिकेचे दर्शन घडवते. प्रत्यक्षात रशियन विमाने हवाई हद्दीत घुसली नाहीत, पण त्यांची उपस्थिती हीच अमेरिका-रशिया संघर्षाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर खूप मोठा संदेश ठरते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal News: ‘ओली असोत किंवा देउबा…’ कोणताही नेता आता नेपाळमधून पळून जाऊ शकणार नाही; कार्की सरकारची जोरदार तयारी
युक्रेन युद्ध – रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून नाटो देशे सतत सावधावली आहेत.
शक्तीप्रदर्शन – रशिया वेळोवेळी आपल्या लढाऊ सामर्थ्याचे प्रदर्शन करतो.
नाटोची भूमिका – युक्रेनला लष्करी मदत देणाऱ्या नाटो देशांना धमकावण्यासाठी रशिया आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत विमान उडवत आहे.
अमेरिकेचे नेतृत्व – अमेरिका नाटोचा प्रमुख घटक असल्याने त्याच्या हद्दीवर चाचपणी करणे ही रशियाची स्पष्ट रणनीती आहे.