Russia's major drone attack on Ukraine
क्वीव: सध्या रशिया-युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र दिवसेंदिवस रशिया आणि युक्रेमध्ये तीव्र संघर्ष निर्माण होत आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ला करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व यूक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्लांत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीसोमर आली आहे. रशियाने यूक्रेनच्या डोनेस्तक प्रांतात डोब्रोपिल्या येथे मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांत 11 जणांचा मृत्यू झाला असून खार्किवमधील हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
अमेरिका-यूक्रेनची सौदी अरेबियात होणार चर्चा
हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेन शांततेसाठी वाटाघाटी करण्यास आमने-सामने येणार आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर नवीन बॅंकिग निर्बंध आणि कर लादण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनला युद्ध संपवण्यासाठी तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशियाशी व्यवहार करणे यूक्रेनपेक्षा सोपे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारत आपले शुल्क कमी करण्यास तयार…’; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
रशिया-यूक्रेन संघर्ष
यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा करणार आहेत. यादरम्यान ते रशिया-यूक्रेन युद्धबंदीवर शांतता कराराच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी तोडगा काढण्यात येईल. सध्या रशिया-युक्रेन संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रशिया यूक्रेनच्या उर्जा आणि वायू उत्पादनांवर हल्ले करत आहे. यामुळे यूक्रेनच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रणात नुकसान झाले आहे. युक्रेनच्या मते रशिया सामान्य युक्रेनियन लेकांना हानी पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.
अमेरिका-यूक्रेन चर्चा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात रशिया युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चा होणार आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शांतता चर्चेला संमती दिली आहे. अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील पहिली औपचारिक शांतता चर्चा सौदी अरेबियात होणार आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात वॉशिंग्टनच्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेली बैठक अयशस्वी ठरली होती आणि दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. मात्र, आता झेलेन्स्की यांनी शांतता चर्चेला सहमती देऊन नवा मार्ग खुला केला आहे.
युक्रेन रागावला
गेल्या महिन्यात, सौदी अरेबियाने अमेरिका आणि रशियाच्या शिष्टमंडळांचे आयोजन केले होते जेथे रियाधमध्ये युद्धविराम चर्चा झाली. मात्र, या चर्चेत युक्रेन आणि युरोपीय देशांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला नसल्याने त्यांची नाराजी उघड झाली. आता युक्रेन आणि अमेरिकेचे अधिकारीही सौदी अरेबियात भेटणार आहेत.