'भारत आपले शुल्क कमी करण्यास तयार...'; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; जाणून घ्या आणखी काय म्हणाले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या टॅरिफ सिस्टीमवर हल्लाबोल करत मोठा खळबळजनक दावा केला आहे. दरम्यान त्यांनी म्हटले आहे की आता भारताला जास्त करामुळे काहीही विकणे अशक्य आहे, यामुळे भारताने अमेरिकेवरील त्यांचे शुल्क कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवासंपूर्वीच कॅनडा, चीन, मेक्सिकोसह भारतावर 2 एप्रिलपासून ‘परस्पर कर’ लादण्याची घोषणा केली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधून आपल्या भाषणात भारताच्या टॅरिफ सिस्टमला संबोधित करताना, भारताने अमेरिकेवरील शुल्क कमी करण्याची तयारी दर्शवल्याचे म्हटले.य ट्रम्प यांनी म्हटले की, “ भारत अमेरिकेवर खूप जास्त कर लादतो. भारतात जवळपास काहीही विकणे अशक्य असून हे त्यांनी मान्य केले आहे.” तसेच त्यांनी असेही म्हटले की, आता भारताला त्यांच्या करांमध्ये कपात करावी लागणार आहे आणि शेवटी त्यांच्या कृत्याचा कोणीतरी पर्दाफाश करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताला झटका! डोनाल्ड ट्रम्प एप्रिलपासून लागू करणार ‘हा’ मोठा निर्णय
#WATCH | Washington, DC: US President Donald Trump says, “…India charges us massive tariffs. Massive. You can’t even sell anything in India…They have agreed, by the way; they want to cut their tariffs way down now because somebody is finally exposing them for what they have… pic.twitter.com/XwytKPli48
— ANI (@ANI) March 7, 2025
कॅनडा आणि युरोपियन युनियनवरही टीका
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2 एप्रिल पासून लागू होणाऱ्या परस्पर करांमुळे अमेरिकेच्या व्यापर धोरमांत अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहे. ट्रम्प यांनी अमेरिका उच्चर कर असलेल्या देशांनी गैरफायदा घेतल्यास सहन करण्यात येणार नाही असे म्हटले आहे. शिवाय त्यांनी कॅडा आणि युरोपियन युनियनवरही टीका केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, भारताप्रमाणेच कॅनडा आणि युरोपही अमेरिकन वस्तूंवर उच्च शुल्क लादत आले आहे. या देशांनी वर्षानुवर्षे अमेरिकेचा फायदा घेतला आहे. मात्र, यापुढे असे होणार नाही. अमेरिकाही इतर देशांवर तेवढाच कर लादेल जेवढा ते आमच्यावर.
व्यापार न्यायपूर्वक आणि संतुलित करण्याचा उद्देश
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, भारत काही अमेरिकन उत्पादनांवर 100% पेक्षा जास्त कर लादतो. यामुळे अमेरिकन उत्पादकांना अडचणी येतात. त्यांनी नमूद केले की, दोन्ही देशांत व्यापर अधिक न्यायपूर्वक आणि संतुलित करण्यासाठी अमेरिका 2 एप्रिलपासून भारतावर रेसिप्रोकल टॅक्स लागू करेल.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापर संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचवेळी भारत अमेरिकेसोबत परस्पर कराऐवजी द्विपक्षीय व्यापार करार (BTA) करण्याचा आग्रह करत असल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही भारतीय अधिकारी अमेरिकेसोबत BTA चर्चेवर लक्ष केंद्रित करत असल्याचे म्हटले होते.