कीव: सध्या रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहेत. जगभरात या युद्धच्या संघर्षविरामासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या वादामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेने युक्रेनला मिळणारी लष्करी मदत थांबवली असून याचा फायदा मात्र रशियाला होत आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हलले करत आहे. दरम्यान युक्रेननियन सैनिकांनी शस्त्रास्त्रांसाठी लागणार दारुगोळा संपत आल्याने रशियन सैनिकांनी मारण्यासाठी वेगळीच पद्धत वापरली आहे.
हल्लयासाठी मधमाशांचा वापर
युक्रेनियन सैनिकांनी पारंपारिक शस्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे सैन्य रशियन सैन्यावर मधमाश्यांचे पोळ्यांचे गोळे झाडत आहे. आतापर्यंत रशियासोबतच्या युद्धात बॉम्ब, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला करण्यात येत होता, मात्र यावेळी युक्रेनच्या सैनिकांनी वेगळी युक्ती वापरली आहे. यामुळे रशियालाही धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दारुगोळा संपल्यानंतर युक्रेनियन सैनिकांनी ग्रेनेड ऐवजी मधमाशांचा वापर करुन रशियन सैनिकांवर गोळीबार केला आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील पोकरोव्स्क शहराजवळ असलेल्या रशियन सैन्यांवर हा हल्ला करण्यात आला आहे. या ठिकाणी रशियाकडून सतत हल्ले होत असतात.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सध्या या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये दोन सैनिकांनी एक बॉक्समध्ये मधमाशांचे पोळे पकडले आहे. हजारो मधमाशांनी भरलेली पेटी घेऊन ते रशियन सैनिकांच्या छावणीच्या ठिकाणी जात आहेत. दोन सैनिक रशियाच्या बंकरमध्ये प्रवेश करतात आणि बॉक्स ओपन करुन पळून जात आहेत. त्यानंतर अचानक रशियन सैन्यावर मधमाशांचा हल्ला झालेले व्हिडिओत पाहायला मिळत आहेत.
Watch the moment Ukrainian soldiers swap grenades for a beehive.
The TWO beehives were dropped into a cellar, where Russian soldiers were hiding, and the tactics are said to have worked.
Watch here👇 pic.twitter.com/Ns3GCpFKLG
— BFBS Forces News (@ForcesNews) March 6, 2025
अनोख्या पद्धतीचा वापर
युक्रेनने आतापर्यंत अनेकवेळा युद्धात नवीन रणनीती वापरली आहे. विशेषत: ड्रोनचा वापर सोडून पारंपारिक पद्धती त्यांनी वापरल्या आहेत. 2022 मध्ये रशियाने अमेरिकेच्या निर्बंधांमुळे संगणकाच्या चिप्स मिळविण्यासाठी रेफ्रिजरेटर आणि डिशवॉशरसारख्या वस्तूंचा वापर केला होता. आता युक्रेनही अनोखी पद्धत वापरत आहे. युक्रेन सैन्याने यापूर्वी ड्रोनचा वापर स्फोटक म्हणून केला आहे. पण मधमाश्यांचा वापर पहिल्यांदाच दिसून आला आहे. असे दिसून येते की युक्रेनियन सैनिक कोणत्याही गोष्टीचे शस्त्रात रूपांतर करू शकतात.