Ryan Routh trial begins for Trump assassination attempt in Florida
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत चर्चेचा विषय बनत असतात. 2024 च्या निवडणुक प्रचारापासून ट्रम्प चर्चेचा विषय बनले आहेत. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्या विरोधात दणदणीत विजय मिळवला होता. त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक जिंकली. दरम्यान या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्पवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे सर्वत्र खळब उडाली होती.
यानंतरही त्यांच्या फ्लोरिडामध्ये गोल्फ खेळत असताना हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला १५ सप्टेंबर २०२४ करण्यात आला होता. दरम्यान या घटनेवर सध्या अमेरिकेच्या जिल्ह्या न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. गुरुवारी (११ सप्टेंबर) ही सुनावणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान एक मोठे अपडेट समोर आली आहे.
आरोपी स्वत:च लढणार खटला
ट्रम्पवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव रायव रुथने असून अमेरिका जिल्ह्या न्यायाधीश आयलीन कॅनन यांच्यासोमर त्याने स्वत:च खटला चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे न्यायालयाने नियुक्त वकिलांन केसमधून काढून टाकले आहे. पण तरीही वकिल न्यायालयात उपस्थि राहणार असून रायनला कोणतीही मदत लागल्यास करणार असल्याचे म्हटले आहे.
रुथने आरोप लावले फेटाळून
रुथने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रायन रुथनवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला करण्यासाशिवाय शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघनाचा, राष्ट्रपती पदाच्या उमेदवारची हत्या करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.
सरकारी वकिलांनी रायन रुथनेवर आरोप केला आहे की, १५ सप्टेंबर २०२४ रोजी ट्रम्पवर हल्ला करुन त्यांच्या हत्येचा प्रयत्न त्याने केला होता. ट्रम्प यांच्या वेस्ट पाम बीच कंट्रीमध्ये गोल्फ क्लबमध्ये खेळत होते. यावेळी त्यांच्यावर ५९ वर्षाय रायन रुथने हल्ला केला. त्या काळात ट्रम्प राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते.
यापूर्वीही झाला होता हल्ला
दरम्यान या हल्ल्यापूर्वी ट्रम्प यांच्यावर पेनसिलव्हेनियामध्ये ट्रम्पवर गोळी झाडण्यात आली होती. सुदैवाने ट्रम्प या हल्ल्यातून बचावले होते. यावेळी गोळी त्यांच्या कानाला लागून गेली होती. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. हल्लेखोरला जागीच पकडून ठार करण्यात आले होते. नंतर ट्रम्प यांनी त्यांच्या सुरक्षेत चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते.
FAQs (संबंधित प्रश्न)
फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्पवर कधी आणि कुठे झाला हल्ला?
ट्रम्प यांच्यावर १५ सप्टेंबर २०२४ रोजी फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथील गोल्फ क्लबमध्ये झाला होता.
कोण केला होता डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला?
रायन रुथने नावाच्या ५९ वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला होता, सध्या त्याच्यावर राष्ट्रपती उमेदवारावर हल्ला आणि त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप लावला आहे.
ट्रम्प यांच्यावर यापूर्वी हल्ला झाला होता का ?
हो, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिव्हेनियातील निवडणुक रॅलीदरम्यान गोळी झाडण्यात आली होती.
Charile Kirk : ‘गुन्हेगारांना सोडणार नाही…’ ; चार्ली कर्कच्या हत्येवर संतापले डोनाल्ड ट्रम्प