Donald Trump Viral Video : वॉशिंग्टन : सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वॉशिंग्टन डीसीतील एका रेस्टॉरंटमध्ये ते गेले असताना तिथे पॅलेस्टिनी समर्थकांनी गोंधळ घातला होता. परंतु यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर कुत्सित (गर्विष्ठ) हास्य दिसले. यामुळे सध्या त्यांच्या या हास्यावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. शिवाय या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्रम्प यांनी आपल्या अनेक निर्णयांनी जगाला धक्का दिला आहे. त्यांंनी अनेक आश्वासने दिले, टॅरिफ, बेकायदेशीरांना हद्दपार, ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी अशा अनेक वेगवेळ्या निर्णयांनी जगभरात खळबळ उडवली. शिवाय ट्रम्प यांनी गाझातील इस्रायल आणि हमास युद्ध. रशिया युक्रेन युद्ध संपवण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही दोन्ही युद्ध सुरुच आहेत.
रेस्टॉरंटमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांचा गोंधळ
तसेच त्यांनी देशांतर्गतही असे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांच्याच नागरिकांना त्यांच्याविरोधात बंड पुकारले. नुकतेच त्यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड तैनातीचा निर्णय घेतला होता. देशातील गुन्हेगारी कमी करण्याचा यामागाच हेतू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. परंतु त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. दरम्यान या निर्णयानंतर ट्रम्प आपला निर्णय कसा योग्य होता हे दाखवण्यासाठी वॉशिंग्टन डीसीतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते.
यावेळी त्यांच्यासोबत उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि इतर सहकारी देखील उपस्थिती होते. परंतु ट्रम्प हॉटेलमध्ये गेल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. हॉटेलमध्ये काही पॅलेस्टिनी सर्थक होते. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प विरोधात घोषणाबाजी केली. पॅलेस्टिनी समर्थकांनी ट्रम्प यांची तुलना हिटलर सोबत केली. तसेच फ्री पॅलेस्टिनीचे नारेही दिले.
Trump is absolutely not “LOVED everywhere he goes”. Here’s another video from his visit to the restaurant.
pic.twitter.com/QmQyaOoryp— Joe Schmo (@pau02370036) September 10, 2025
ट्रम्प केवळ स्मित हास्य करत राहिले
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प व्हाइट हाइउपासून जवळच असलेल्या १५ व्या स्ट्रीटवरील जोज सीफूड, प्राइम स्टीक अँड स्टोन क्रॅब रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यावेळी ट्रम्प यांना पाहताच अनेक लोक शॉक झाले होते. पण रेस्टॉरंटमध्य पॅलेस्टिनी समर्थकही होते. ट्रम्प यांना पाहताच पॅलेस्टिनी समर्थकांनी गोंळध घालायला सुरुवात केली. मात्र या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प स्मित हास्य करत गोंधळ करणाऱ्यांकडे पाहत तसेच पुढे जात राहिले. तसेच त्यांनी गार्ड्स ना त्यांना बाहेर काढण्याचाही सल्ला दिला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.