
S Jaishankar Ethiopia speech UNSC reforms S Jaishankar
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी इथिओपियाच्या राजधानीत, अदिस अबाबा येथील ऐतिहासिक अडवा मेमोरियल म्युझियममध्ये एका विशेष सभेला संबोधित करताना जागतिक व्यवस्थेच्या दुटप्पीपणावर जोरदार प्रहार केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सुधारणा प्रक्रियेला हेतुपुरस्सर विलंब लावणाऱ्या देशांवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. सध्याची सुरक्षा परिषद ही आधुनिक जगाचे वास्तव मांडण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असून ती न्याय्य पद्धतीने प्रतिनिधित्व करत नाही, असे मत त्यांनी मांडले.
जयशंकर यांनी स्पष्ट केले की, जागतिक निर्णय प्रक्रियेच्या पटलावर भारत आणि आफ्रिका खंडाची अनुपस्थिती किंवा अपुरे प्रतिनिधित्व हे आजच्या २१ व्या शतकात अत्यंत अस्वीकार्य आहे. एका कालबाह्य जागतिक व्यवस्थेचा फटका भारत आणि आफ्रिकन देशांना सातत्याने सहन करावा लागत असून, बहुपक्षीय संस्थांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची वेळ आता आली आहे.
Delighted to meet Foreign Minister @GHessebon of Ethiopia in Addis Ababa. The India – Ethiopia Strategic Partnership is based on our shared values, common aspirations and historic South – South solidarity. Had wide-ranging discussions on strengthening our bilateral ties, covering trade, investment, development projects to infrastructure, maritime, security, technology and culture. Also exchanges perspectives on global developments, as well as strengthening our multilateral engagement and India – African Union partnership. 🇮🇳 🇪🇹 — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 9, 2026
credit – social media and Twitter
आपल्या भाषणात डॉ. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सद्यस्थितीवर अत्यंत बारकाईने भाष्य केले. गेल्या दशकात जागतिक संकटे, युद्धे आणि आर्थिक आव्हानांसमोर संयुक्त राष्ट्रे ही संस्था सातत्याने असहाय्य आणि प्रभावहीन सिद्ध झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सुरक्षा परिषदेत जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचे योग्य प्रतिनिधित्व नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Panama Earthquake: जमीन हादरली, इमारती कोसळल्या! पनामामध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, अनेक देशांमध्ये त्सुनामी अलर्ट; थरारक VIDEO VIRAL
त्यांनी सांगितले की, सुरक्षा परिषदेतील सुधारणांचा मुख्य उद्देश केवळ सध्याच्या व्यवस्थेत काही जादा खुर्च्या किंवा जागा वाढवणे हा मुळीच नाही. तर या सुधारणांचा खरा हेतू जागतिक प्रशासनाला (Global Governance) अधिक लोकशाहीवादी, उत्तरदायी आणि खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक बनवणे हा आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सर्व खंडांना योग्य वाटा मिळत नाही, तोपर्यंत संयुक्त राष्ट्र आपली विश्वासार्हता आणि कार्यक्षमता परत मिळवू शकणार नाही.
भारताने आपल्या धोरणात्मक भूमिकेतून नेहमीच विकसनशील आणि आफ्रिकन देशांचा आवाज जागतिक स्तरावर बुलंद केला आहे. २०२३ मध्ये भारताच्या जी२० (G20) अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियनला (African Union) या मुख्य जागतिक मंचाचे स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय कूटनितीने ऐतिहासिक भूमिका बजावली होती.
याच यशाची आठवण करून देत डॉ. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, जो न्याय जी२० मध्ये आफ्रिकेला मिळाला, तोच न्याय आणि तत्त्व संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणांना देखील लागू झाले पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींमध्ये आफ्रिकन खंडाला पूर्ण आणि न्याय्य प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा
भारत आणि आफ्रिका खंडातील संबंध हे केवळ आजचे राजनैतिक संबंध नसून, त्यांना हजारो वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. दोन्ही प्रदेशांनी वसाहतवादाविरोधात लढा दिला आहे आणि स्वातंत्र्यानंतर समान आर्थिक व सामाजिक आव्हानांचा सामना केला आहे. जयशंकर यांनी पुनरुच्चार केला की, आफ्रिका खंड हा नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणात सर्वोच्च प्राधान्यक्रमावर राहिला आहे आणि यापुढेही राहील.
भविष्यातील ध्येयांवर बोलताना त्यांनी सांगितले की, भारत आपल्या स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्धापनदिनानिमित्त २०२४ पर्यंत ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून कार्य करत आहे. दुसरीकडे, आफ्रिकन खंडाने देखील आपल्या प्रगतीची रूपरेषा आखत ‘अजेंडा २०६३’ (Agenda 2063) च्या माध्यमातून समृद्ध आफ्रिकेचे चित्र रेखाटले आहे. दोन्ही देशांचे हे सामायिक ध्येय केवळ आपापल्या भागांचा विकास करणार नाही, तर जगाला अधिक संतुलित आणि बहुध्रुवीय (Multipolar) बनवण्यात मोलाचे योगदान देईल.