रशिया-युक्रेन युद्धावर भारताची मध्यस्थीची भूमिका; एस. जयशंकर यांची प्रतिक्रीया म्हणाले...
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. हे दीर्घकाळ चालणारे युद्ध थांबवणे हे मोठे आव्हान आहे. दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशिया-युक्रेन युद्धावर आपले विचार मांडले आहे. त्यांनी स्पष्ट केले की,भारताची भूमिका या संघर्षाचे समाधान संवादाद्वारे होईल, न की युद्धाचा प्रसार करण्यासाठी. जयशंकर यांच्या मते, “सुई युद्धाच्या पुढे जात असताना, ती आता अधिक संवादाच्या दिशेने वळत आहे.”
जयशंकर यांचे हे वक्तव्य दर्शविते की भारत नेहमीच शांततामय मार्गाने समस्यांचे निराकरण करण्याच्या बाजूने आहे आणि हेच कारण आहे की भारताला वैश्विक पातळीवर प्रभावी स्थान मिळाले आहे. जयशंकर यांनी सांगितले की भारताने या संघर्षात तटस्थ भूमिका घेतली आहे, परंतु दोन्ही बाजूंशी संवाद राखला आहे. त्यांनी म्हटले की, “आम्ही रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांशी संवाद साधला आहे. भारताने मॉस्कोतील अध्यक्ष पुतिन आणि कीवमधील अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी भेट घेतली आहे आणि पारदर्शकपणे एकमेकांसोबत संदेश शेअर केले आहेत. “भारताचा हेतू असा आहे की भविष्यात एक सामान्य संवादाची प्रक्रिया तयार होईल. यामुळे युद्धाचा समारोप आणि शांततेची प्रक्रिया हळूहळू सुरू होईल.
ग्लोबल साऊथच्या हितांचे रक्षण करणे
भारताने ग्लोबल साउथच्या हितांचा देखील विचार केला आहे. जयशंकर यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, “भारत 125 देशांच्या भावना आणि आवश्यकतांचा विचार करत आहे. युक्रेन युद्धामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर, जसे की इंधन आणि अन्नाच्या किंमतीत वाढ, महागाई आणि खतांच्या किमतीत वाढ, भारताचा लक्ष आहे.”
भारताची राजनैतिक भूमिका
जयशंकर यांनी याबाबत सांगितले की भारत हा संघर्षाच्या सर्व बाजूंमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे शांतता आणि स्थिरतेच्या दिशेने एक नवा मार्ग खुला होईल. भारताच्या या दृष्टिकोनातून स्पष्ट होते की भारत नेहमीच संवाद आणि भागीदारीच्या माध्यमातून संघर्षांचे समाधान शोधतो, सैनिकी उपायांपासून दूर राहतो. त्यामुळे भारत जागतिक कूटनीतीत एक सकारात्मक आणि सक्रिय भूमिका निभावत आहे, ज्यामुळे त्याचे स्थान आणखी मजबूत होईल.
पुतिन यांचा 2025 मध्ये भारत दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना भारत भेटीचे औपचारिक आमंत्रण दिले आहे. अशी माहिती क्रेमिनलचे अध्यक्ष युरी उशाकोव्ह यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पुतिन 2025 च्या सुरूवातीला भारताला भेट देतील. या भेटीचा उद्देश भारत आणि रशिया मजबुत करण्याचा आहे असे त्यांनी सांगितले. रशिया-भारत संबंध सुधारतील अशा अपेक्षा या भेटीद्वारे ठेवण्यात आली आहे. हा निर्णय दोन्ही देशाच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे.