फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ढाका: बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांची मालिक सुरुच आहे. पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी हिंदू समाजाला लक्ष्य केले आहे. काल (6 डिसेंबर 2024) ढाका येथील ISKCON नमहट्टा मंदिरावर हल्ला करण्यात आला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यादरम्यान मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि देवतांच्या मूर्त्यांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले. कोलकात्यातील ISKCON चे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
राधारमण दास यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, कट्टरपंथीयांनी आधी मंदिराची छप्पर हटवली आणि नंतर मूर्त्यांना पेटवले. राधारमण दास यांनी याला हिंदूंवरील वाढत्या अत्याचाराचे उदाहरण म्हणत गंभीर चिंता व्यक्त केली असून हे हल्ले थांबण्याची बांगलादेश सरकारकडे केली आहे. तसेच या हल्ल्यानंतर हिंदू संघटनांनी देखील पुन्हा एक युनूस सरकारवर आरोप केला आहे. संघटनांनी युनूस सरकार मुक झाल्याचे म्हटले आहे.
Another ISKCON Namhatta Centre burned down in Bangladesh. The Deities of Sri Sri Laxmi Narayan and all items inside the temple, were burned down completely 😭. The center is located in Dhaka. Early morning today, between 2-3 AM, miscreants set fire to the Shri Shri Radha Krishna… pic.twitter.com/kDPilLBWHK
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) December 7, 2024
चिन्मय दास यांच्या अटकेनंतर हिंदूंवरील हल्ल्यांत वाढ
या हल्ल्यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी बांगलादेशात हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चिन्मय कृष्ण दास यांच्यावर हिंदू समाजाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशाच्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यांची अटक ही हिंदू समुदायाच्या विरोधातील कट्टर कारवायांचा भाग असल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे.
हिंदूंवरील हल्ले जागतिक समुदायासाठीही चिंतेचे कारण
ढाकातील नमहट्टा मंदिरावर झालेला हल्ला हा केवळ ISKCON नव्हे तर एकूणच हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचा कट असल्याचे मत हिंदू संघटनांनी मांडले आहे. हिंदू मंदिरांना लक्ष्य करणे, हिंदू धर्मगुरूंना अटक करणे आणि देशद्रोहाचे आरोप लावून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ISKCON सारख्या जागतिक संस्थांवर हल्ले होणे हे जागतिक समुदायासाठीही चिंतेचे कारण आहे. हिंदू संघटनांनी या घटनांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष देऊन बांगलादेश सरकारवर दबाव टाकण्याची मागणी केली आहे.