फोटो सौजन्य: सोशल मीडिया
निकोशिया: तुर्कीच्या सायप्रस देशाला इस्त्रायलचे अध्यक्ष बेजांमिन नेतन्याहूंचा पाठिंबा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलकडून सायप्रसने अत्याधुनिक एअर सिस्टम खरेदी केले असून आपल्या संरक्षण क्षमतेते वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रणालीचा पहिला तुकडा देशाला मिळाला आहे. सायप्रसचा तुर्की देशाशी असलेल्या वादग्रस्त संबंधाच्या पार्श्वभूमीवर ही खरेदी महत्त्वाची मानली जात आहे.
सायप्रसचे संरक्षण प्रयत्न
सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्तोडूलिड्स यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “आम्ही सायप्रसच्या सामर्थ्याला बळकट करण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक पावले उचलत आहोत. सायप्रस एक युरोपियन युनियन सदस्य असून भू-रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशात स्थित आहे.” 1974 मध्ये तुर्कीने केलेल्या आक्रमणामुळे सायप्रस विभागला गेला होता. मात्र, त्यानंतर आजही उत्तर सायप्रस तुर्कीच्या नियंत्रणाखाली आहे. यामुळे देशाला तुर्कीच्या नियंत्रणातून सोडवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
रशियन उपकरणांची जागा इस्रायली तंत्रज्ञानाला
सायप्रसकडे पूर्वी रशियन बनावटीचे टोर M1 अँटी-एअरक्राफ्ट सिस्टम होते. मात्र, रशियाकडून होणाऱ्या उपकरणांच्या पुरवठ्यावर 2022 मध्ये युक्रेन युद्धानंतर निर्बंध घालण्यात आले. परिणामी, या उपकरणांच्या सुट्या भागांची कमतरता आणि अपग्रेडची अडचण निर्माण झाली. या परिस्थितीत सायप्रसने युरोपियन युनियन देश आणि इस्रायलकडे मदतीचा हात पुढे केला.
इस्रायली बराक एमएक्स एअर डिफेन्स सिस्टम हे जुने रशियन तंत्रज्ञान बदलून बसवले जात आहे. बराक एमएक्स प्रणाली आधुनिक क्षेपणास्त्र प्रतिबंध तंत्रज्ञानाने सज्ज असून, त्याचा उद्देश संभाव्य तुर्की ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे आहे. या प्रणालीमुळे सायप्रसच्या हवाई सुरक्षेत लक्षणीय वाढ होईल असे म्हटले जात आहे.
तुर्की-सायप्रस तणावाचा परिणाम
सायप्रस आणि तुर्की यांच्यातील तणाव 1974 पासून सुरू आहे. मात्र, सायप्रसने संरक्षणाच्या कोणत्याही खरेदीसंदर्भात खुलासा अद्याप केलेला नाही. यामुळे तुर्कीशी तणाव पुन्हा वाढण्याची भीती आहे. इस्रायलचे सहाय्य सायप्रसला तुर्कीच्या वाढत्या दबावाला सामोरे जाण्यासाठी मदत करू शकते. सायप्रस हा युरोपियन युनियनचा सदस्य असल्यामुळे युरोपियन देश त्याला रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान मानतात. इस्रायलसोबतच्या करारामुळे सायप्रसच्या संरक्षण धोरणाला आणखी बळ मिळणार आहे.
इस्त्रायलची मदत
सायप्रसने इस्रायली तंत्रज्ञानाचा स्वीकार करून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे. तुर्कीच्या संभाव्य आक्रमणांना उत्तर देण्यासाठी आणि आपल्या हवाई सुरक्षेला मजबूती देण्यासाठी ही मोठी उडी मानली जात आहे. यामुळे सायप्रसच्या भू-रणनीतिक महत्त्वाला जागतिक स्तरावर अधोरेखित केले जाईल.