Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Crisis 2026: इराणमध्ये युद्धाचा भडका! रक्ताळलेल्या इराणचा भारताला मदतीसाठी फोन; एस. जयशंकर यांची अरघचींशी महत्त्वाची चर्चा

Iran Protests 2026 : इराण संकटावरून मध्य पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये तणाव वाढत आहे. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी चर्चा केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 15, 2026 | 11:33 AM
s jaishankar talks to iran foreign minister araghchi citizens leave iran advisory 2026

s jaishankar talks to iran foreign minister araghchi citizens leave iran advisory 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • उच्चस्तरीय राजनैतिक चर्चा
  • भारताचा ‘एक्झिट’ प्लॅन
  • नरसंहाराचे सावट

Jaishankar calls Iran Foreign Minister Araghchi 2026 : मध्य पूर्व आणि पश्चिम आशियात सध्या परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. इराणमध्ये (Iran) अंतर्गत बंडाळी आणि परकीय आक्रमणाची टांगती तलवार असतानाच, बुधवारी रात्री इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना फोन करून तातडीने संवाद साधला. या संभाषणाने जागतिक राजकारणात भारताची मध्यस्थ म्हणून असलेली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. जयशंकर यांनी स्वतः ‘X’ (ट्विटर) वर या चर्चेची पुष्टी करत म्हटले की, “इराण आणि आजूबाजूच्या प्रदेशातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर आमची सविस्तर चर्चा झाली आहे.”

इराणमध्ये रक्ताचा सडा: २,५०० पेक्षा जास्त मृत्यू?

इराणमधील आर्थिक संकट, महागाई आणि बेरोजगारीमुळे २८ डिसेंबर २०२५ पासून निदर्शने सुरू आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. ‘इराण इंटरनॅशनल’ आणि ‘एमनेस्टी’ सारख्या संस्थांच्या मते, इराणमधील सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. काही अहवालांनुसार ही संख्या १२,००० च्या पुढे गेली असून, इराणचे ३१ पेक्षा जास्त प्रांत सध्या आगीच्या विळख्यात आहेत. इंटरनेट ब्लॅकआउट करून सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी तिथली परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS2026 : ब्रिक्समध्ये मोठी फूट! ट्रम्पच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेने घेतली माघार; इराणबाबत घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

भारताची मोठी अ‍ॅडव्हायझरी: “इराण सोडा!”

भारतासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे तिथे वास्तव्यास असलेले सुमारे १०,००० भारतीय नागरिक. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि व्यावसायिक आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अत्यंत कठोर शब्दात सूचना जारी केली आहे की, “जे भारतीय नागरिक सध्या इराणमध्ये आहेत, त्यांनी व्यावसायिक उड्डाणे उपलब्ध असेपर्यंत तातडीने तो देश सोडावा.” तसेच, कोणत्याही भारतीय पर्यटकाने पुढील सूचना मिळेपर्यंत इराणला प्रवास करू नये, असेही बजावण्यात आले आहे.

#BREAKING: Iranian Foreign Minister and Indian External Affairs Minister speak on Iran situation. India’s EAM @DrSJaishankar says: “Received a call from Iranian Foreign Minister Seyed Abbas Araghchi. @araghchi. We discussed the evolving situation in and around Iran.” — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 14, 2026

credit – social media and Twitter

ट्रम्प यांची धमकी आणि जागतिक तणाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील या परिस्थितीवर भाष्य करताना आंदोलकांना “मदत लवकरच पोहोचेल” (Help is on its way) असे सूचक विधान केले आहे. ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाई करण्याचे संकेत दिले असून, तेहरानवर २५% व्यापार शुल्क (Tariffs) लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिका आणि इराण पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीतील इराणी दूतावासाने अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयांना “जागतिक व्यवस्थेला कमकुवत करणारे” म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest 2026: रस्ते रक्ताने माखले, शवागारे भरली; इराणमधील नरसंहाराचा ‘हा’ खळबळजनक अहवाल वाचून डोळे पाणावतील

संकटाचे मूळ: महागाई आणि बेरोजगारी

इराणमध्ये एका अमेरिकन डॉलरची किंमत १४ लाख रियालच्या पुढे गेली आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर ५० ते ७० टक्क्यांनी वाढल्याने सामान्य इराणी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन दशकांतील हे इराणपुढील सर्वात मोठे संकट आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धानंतर आता इराणमधील हे गृहयुद्ध संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकते, विशेषतः भारताच्या इंधन पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची भीती आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने इराणसाठी कोणती ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे?

    Ans: भारताने आपल्या नागरिकांना इराणला न जाण्याचा सल्ला दिला असून, जे आधीच तिथे आहेत त्यांनी तातडीने देश सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • Que: इराणमध्ये निदर्शने का होत आहेत?

    Ans: देशातील प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि इराणी रियालची घसरलेली किंमत यांमुळे नागरिकांमध्ये संताप असून त्यांनी सरकारविरोधात बंड पुकारले आहे.

  • Que: अमेरिकेने इराणला कोणती धमकी दिली आहे?

    Ans: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आंदोलकांच्या हत्येवरून इराणला लष्करी कारवाई आणि कठोर व्यापार निर्बंध लादण्याची उघड धमकी दिली आहे.

Web Title: S jaishankar talks to iran foreign minister araghchi citizens leave iran advisory 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • international news
  • iran
  • Iran Protest
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

इराणमध्ये हिंसाचाराची धग कायम; आत्तापर्यंत 3000 जणांचा मृत्यू, सुरक्षा दलाकडून ओपन फायरिंग
1

इराणमध्ये हिंसाचाराची धग कायम; आत्तापर्यंत 3000 जणांचा मृत्यू, सुरक्षा दलाकडून ओपन फायरिंग

US Visa Update: अमेरिकेचा मोठा निर्णय! ७५ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया बंद; रशिया, ब्राझीलसह ‘या’ देशांचा समावेश
2

US Visa Update: अमेरिकेचा मोठा निर्णय! ७५ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया बंद; रशिया, ब्राझीलसह ‘या’ देशांचा समावेश

Iran Protest 2026: जग संपणार? इराणचा नाश निश्चित; ‘Wing Of Zion’ इस्त्रायलबाहेर, विषय काय?
3

Iran Protest 2026: जग संपणार? इराणचा नाश निश्चित; ‘Wing Of Zion’ इस्त्रायलबाहेर, विषय काय?

BRICS2026 : ब्रिक्समध्ये मोठी फूट! ट्रम्पच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेने घेतली माघार; इराणबाबत घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय
4

BRICS2026 : ब्रिक्समध्ये मोठी फूट! ट्रम्पच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेने घेतली माघार; इराणबाबत घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.