सामोसा (Samosa) हा भारतीयांचा खूप आवडता नाश्त्याचा पदार्थ आहे. कोणती पार्टी असो किंवा बाहेर गेल्यावर अचानक भूक लागलेली असो सामोसा खाण्याला अनेकजण प्राधान्य देतात. फक्त भारतातच नाही तर परदेशातील लोकांनाही सामोसा खाणे आवडते. मात्र जगात असा एक देश आहे जिथे सामोसा खाण्यावर बंदी (Ban On Eating Samosa) आहे. ही बंदी असण्यामागचं कारण समजलं तत तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. नक्की कोणता देश आहे जिथे एका विशिष्ट कारणामुळे सामोसा खाण्यावर बंदी आहे ते जाणून घेऊयात.
[read_also content=”इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने घेतली १० कोटींची देणगी, अनिल गोटेंनी दिला ईडीकडे तक्रार करण्याचा इशारा https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/anil-gote-said-that-bjp-took-10-crore-donation-from-iqbal-mirchi-nrsr-248599.html”]
जगात एक असा देश आहे जिथे सामोसा खाण्यावर बंदी (Ban On Samosa Eating In Somalia) आहे. या देशाचे नाव सोमालिया (Somalia) असं आहे. सोमालियामध्ये कुणीही चुकूनही सामोसा खात नाही. सोमालियामध्ये सामोसा खाण्यावर बंदी आहे ती त्याच्या आकारामुळे. सामोसा त्रिकोणी आकाराचा असतो. सोमालियातील एक समूह मानतो की त्रिकोणी रुप हे ख्रिश्चन कम्युनिटीशी संबंधित आहे. त्रिकोणी आकार हे पवित्र चिन्ह आहे. या चिन्हाला मान देण्यासाठी सोमालियामध्ये सामोसा खाल्ला जात नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमालियातील लोकांनी सामोसा खरेदी केला, बनवला किंवा खाल्ला तरी त्यांना शिक्षा दिली जाते. काही रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे की, सोमालियामध्ये सामोसा खाण्यावर बंदी असल्याचे कारण म्हणजे तिथे भूकबळी गेलेल्या जनावरांचे मांस सामोसा बनवताना वापरले जाते. तसेच असेही सांगितले जाते की, सोमालियामध्ये सामोसा आक्रमकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे याच्यावर बंदी आणण्यात आली आहे. सोमालियामध्ये सामोसा खाण्यावर पूर्ण बंदी आहे.