Saudi Arabia-Iran Relations Saudi Arabia airline resumes first Iran hajj flights since 2015
रियाध: गेल्या अनेक काळापासून एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या देशांमध्ये आता पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होत आहे. मध्य-पूर्वेतील देश इराण आणि सौदी अरेबियामध्ये पुन्हा एकदा हजच्या निमित्ताने संबंधात सुधार होत आहे. यामागचे कारण म्हणजे सौदी अरेबियाने २०१५ नंतर बंदी घातलेली उड्डाण सेवा इराणसाठी पुन्हा सुरु केली आहे. ही सेवा इराणमधील हद यात्रकरुसांठी सुरु करण्यात आली आहे. यामुळे इराणच्या हज यात्रेकरुंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या फ्लायनास एअरलाईन्स ने शनिवारी (१७ मे) तेहरानच्या इमाम खोमेना या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन इराणी यात्रेकरुंसाठी उड्डाणे पुन्हा सुरु केली आहेत. यामुळे सुमारे ३५ हजार इराणी यात्रेकरुंना हजला जाता येणार आहे.
यापूर्वी इराणी नागरिकांना केवळ चार्टर्ड फ्लाइट्सद्वारे सौदी अरेबियाला जाण्याची परवानगी होती.मात्र आता दोन्ही देशांनी नियमित उड्डाणसेवा सुरु केली आहेत. यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारत असल्याचे दिसून येत आहे.
मध्य पूर्वेतील सौदी अरेबिया आणि इराण एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जातात. दोन्ही देशांच्या शत्रूत्त्वामागे धार्मिक मतभेद असल्याची माहिती आहे. इराण हा शिया मुस्लिमांचा देशा आहे, तर सौदी अरेबिया हा सुन्नी मुस्लिमांचा देश आहे.
परंतु २०१५ च्या यात्रेमध्ये सैदी अरेबियात १३९ इराणी यात्रेकरुंच्या मृत्यूने दोन्ही देशांत शत्रूत्व निर्माण झाले होते. इराणने सौदीवर नागरिकांच्या मृत्यूबद्दल अलंवेदनशील असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरणा आंतरराष्ट्रीय न्यायालयापर्यंत गेले होते.
तसेच २०१६ मध्ये सौदी अरेबियाने शिया धर्मगुरु अल-निम्र यांना फाशीची शिक्षा दिली होती. यानंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली होती. यामुळे तेहरानमधील सौदी दूतावासावरही हल्ला करण्यात आला होता.या तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने इराणशी राजनैतिक संबंध तोडले.
जवळपास सात वर्षे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध होते. या काळात अनेक इराणी हज यात्रेसाठी गेले, परंतु सौदी अरेबियाने त्यांना तुच्छ वागणूक दिली.
दरम्यान मार्च २०२३ मध्ये चीनच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यास सुरुवात झाली. यानंतर सौदी अरेबियाने इराणमध्ये तसेच इराणने सौदी अरेबियामध्ये पुन्हा दूतावासाची सुरुवात केली.
यानंतर दोन्ही देशांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये अनेक बैठकी झाल्या. या बैठकीत दोन्ही देशांनी संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला.
२०२४ मध्ये इस्लामी देशांच्या बैठकीत इराणन सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी भेटीचे आमंत्रण दिले. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी परस्पर संबंध दृढ करणाऱ्यावर भर दिला.
सध्या दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होत आहे. हजच्या निमित्ताने सुरु असलेला हा संवाद सहकार्य आणि शांततेच्या दिशेने जाईल अशी आशा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे मध्य-पूर्वेतील राज्यात स्थिरता निर्माण होईल.