सौदी अरेबियातील हज यात्रा दरवर्षी जगभरातील लाखो मुस्लीमांसाठी एक अत्यंत पवित्र आणि भावनिक अनुभव देते. परंतु गेल्या काही काळापासून उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे यात्रेच्या काळात मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये हय यात्रेत हजाराहून अधिक लोकांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी देखील वाढली होती. यामुळे यंदा सौदी अरेबियाने हज यात्रेसाठीचे नियम अधिक कडक केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला लाखोंचा दंड भरावा लागू शकतो. यामुळे आपण आज हज यात्रेसाठीचे नियम जाणून घेऊयात.
Hajj 2025
2025 च्या हज यात्रेदरम्यान मक्का आणि मदिनाला होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौदी अरेबियाने कडक नियम लागू केले आहेत
सौदी सरकारने परवानगीशिवाय हज यात्रेला येणाऱ्या लोकांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहे
या वर्षी हज यात्रा 4 जून ते 9 जून 2025 दरम्यान होण्याची शक्यता आहे
सौदी अरेबियाने 2025 च्या हज यात्रेसाठी विना परवाना हजला जाणाऱ्यांना 4.5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची घोषणा केली आहे. हे नियम व्हिसाधारकांसाठी देखील लागू होतील
सौदी अरेबिया सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, एखाद्या व्यक्तीने नोंदणीशिवाय हज यात्रेला मदत केली तर त्याला 22.7 लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल
तसेच परवान्याशिवाय हॉटेलमध्ये आणि अपार्टमेंटमध्ये यात्रेकरुंना आश्रय दिल्यास 22.7 लाखांपर्यंतचा दंडाची घोषाणा करण्यात आली आहे
याशिवाय, हज यात्रेत बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्यांना देशाबाहेर काढण्यात येईल आणि पुढील 10 वर्षेल हज यात्रेची परवानगी देण्यात येणार नाही
परवाना न घेता वाहन चालवत असेल तर लाखोंचा दंड आकरला जाईल आणि वाहन जप्त केले जाईल
29 एप्रिल रोजी भारतातून हज विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. लखनऊ आणि हैदराबादमधून पहिले उड्डाण करण्यात आले आहे. या वर्षी 1 लाख 22 हजार 518 भारतीय यात्रेकरु हज यात्रेला जाणार आहेत