Hajj 2025: भारतीय मुस्लिमांसाठी दिलासादायक बातमी; सौदी अरेबियाने हज यात्रेसाठी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु केली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली/रियाध: भारतीय मुस्लिमांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता हज यात्रा पूर्वीपेक्षा सोपी, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर करण्यात आली आहे. या श्रेय भारत आणि सौदी अरेबियातील दृढ संबंधांना जाते. येत्या काही दिवसांत पंतप्रधान मोदी 22-23 एप्रिल रोजी सौदी दौऱ्यावरवर जाणार आहेत. यापूर्वी सौदी अरेबियाने पुन्हा एकदा हज यात्रेसाठी भारतीयांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी सौदी अरबेयाने भारतासह आणखी 14 देशासाठी व्हिसा बंदी लागू केली होती.
परंतु ही व्हिसा बंदी आता उठवण्यात आली आहे. आता हज कोट्यामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रवासासाठी महत्वाच्या सवलती आणि यात्रेकरुंसाठी चांगल्या व्यवस्था देखील उपलब्ध होणार आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
The Government of India accords high priority to facilitating the Haj pilgrimage for Indian Muslims. Due to sustained efforts, India’s Haj quota has risen from 136,020 in 2014 to 175,025 in 2025—finalized annually by Saudi authorities.@PMOIndia @RijijuOffice @RijijuOffice…
— Ministry of Minority Affairs (@MOMAIndia) April 15, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी एजंटच्या चुकांमुळे 10 हजार मुस्लिमांची हज यात्रा राहिली होती. खाजगी एजंटमुळे यात्रेकरुंच्या लोकांच्या हजवर बंदी घालण्यात आली होती. परंतु भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सौदी अरेबियाशी चर्चा केली असून ही प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये हज यात्रेसाठी भारताचा कोटा 1,36,020 होता, त्यानंतर 2015 मध्ये तो 1,75,025 वाढवण्यात आला होता. हा कोटा दरवर्षी सौदी अरेबियाकडून निश्चित केला जातो. गेल्या वर्षी हज यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यामुळे या वर्षा हा कोटा कमी करण्यात आला होता. तसेच अनेक नवीन नियमनही लागू करण्यात आले होते. दरम्यान चर्चेनंतर यामध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताची सौदी अरेबियाशी वाढती जवळीक आता धार्मिक तीर्थयात्रेतही सुधारणा करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये भारतीय कोट्यात हज यात्रेसाठी 1,22,518 प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विमानांपासून ते मक्का-मदिना पर्यंतची वाहतूक, मीना कॅम्पमध्ये राहण्याची सोय, निवास, जेवण या सर्व व्यवस्था मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आली आहे.
दरम्यान खासगी टूर्सविरोधात कडक कारवाई करण्यात आली असून यावेळी पारदर्शकता आणि जबाबदारीला चालना देण्यासाठी फक्त 26 खाजगी टूर्सला मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी 800 हून अधिक खाजगी टूर्स ऑपरेटर कार्यरत होत्या. परंतु खासगी टूर चालकाच्या हलगर्जीपणामुले अंतिम मुदत चूकली आणि यात्रेकरुंचे व्हिसा रद्द झाले. यामुळे त्यांच्या विरोधात कडक कारवाी करण्यात आली आहे.
भारताने सौदी अरेबियाशी उच्चस्तरीय संवाद सुरु केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबियाशी यासंबंधी चर्चा केली आणि यामुळे सौदी सरकारकडून 10 हजार अधिक यात्रेकरुंसाठी हज व्हिसा पुन्हा सुरु करण्यात आला. हे एक महत्वाचे राजनैतिक पाऊल आहे. दरम्यान 22-23 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी देखील सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. यामुळे संबंध अधिक दृढ होऊन भारताला हज यात्रेसाठी अधिक विशेष सवलती मिळू शकतात.