Saudi Arabia news Crown Prince salman five decisions for modernization of Suadi
रियाध: सौदी अरेबिया हा त्याच्या रुढीवादी परंपरा आणि कठोर इस्लामिक नियमांसाठी ओळखला जाणारा देश आहे. परंतु अलीकडच्या काही काळात सौदी अरेबियाचे शासक क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इस्लामिक देशात क्रांतिकारी बदलासाठी अनेक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत विविधता आणण्यसाठी, तसेच देशात पर्यटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय आकर्षित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.
सौदी अरेबिया आणि परदेशी उपक्रमांमध्ये सहभागी होती आहे. यामध्ये सांस्कृतिक गोष्टींमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहे. आज आपण एमबीएस म्हणून ओळखले जाणारे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी घेतलेल्या पाच क्रांतिकारी निर्णयांबद्दल जाणून घेणार आहोत.
महिलांना गाडी चालवण्याचे स्वातंत्र
सौदी अरेबियात महिलांवर अनेक निर्बंध आहेत. परंतु क्राउन प्रिन्स यांनी महिलांना गाडी चालवण्याची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. हा महिला सक्षणीकरणाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. २०१८ मध्ये यावरील बंदी क्राउन प्रिन्स यांनी उठवली होती. तसेच कामगार क्षेत्रात महिलांचा ३० टक्क्याने वाटा वाढवण्यात आला आहे. व्हिजन २०३० अंतर्गत क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी हा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या प्रशासनाने महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वातंत्र्य बनवण्याचा दिशेने पाऊल टाकले आहे.
सौदी अरेबियामध्ये दारुवरील बंदी कायम आहे. परंतु सौदी अरेबियाने बिगर मुस्लिम राजदूतांना मद्यपान करण्याची परवानगी दिली असल्याचे म्हटले जात आहे. सौदी अरेबियात जानेवारी २०२४ मध्ये राजधानी रियाधमध्ये सरकार मान्य बार उघडण्यात आला आहे. या निर्णयाचा उद्देश देशातील बेकायदेशीर दारुची तस्करी कमी करणे आहे.
सौदी अरेबियाने धार्मिक पोलिसांच्या काही नियमांमध्ये बदल केला आहे. सौदी अरेबियात धार्मिक पोलिसांना मुतावा म्हणून ओळखले जाते. हे मुतावा समाजावर कडक नजर ठेवत असत. या पोलिसांनी ड्रेस कोड, लिंगभेद आणि सामाजिक वर्तनावर नियंत्रण ठेवले होते. परंतु प्रिन्स सलामा यांनी मुतावाचे अधिकार मर्यादित केले आहे. नवीन नियमांनुसार, मुतावाला अटक करण्याचा अधिकार नाही. तसेच नमाज पाठणाच्या वेळी दुकाने बंद ठेवण्याची अट देखील हटवण्यात आली आहे.
क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदी अरेबियाला पर्यटनाचे आणि मनोरंजनाचे जागतिक केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चित्रपटेगृहे, संगीत, कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केले आहेत. यासाठी संगीत महोत्सवांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. २०२४ मध्ये पॉप आयकॉन जेनिफर पोपोझ आणि हॅले बेरी यांचे कॉन्सर्ट देखील आयोजित करण्यात आले होते. तसेच येत्या काळात विश्वचषकाचे देखील आयोजन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. क्रिडा क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
व्हिजन २०३० अंतर्गत क्राउन प्रिन्स यांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. व्हिजन २०२३० चा उद्देश देशाच्या अर्थव्यवस्थेत विविधता आणण आहे. यामुळे तंत्रज्ञान, पर्यटन, क्रिडा, आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सौदीने गुंतवणूक केली आहे.