Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! हज यात्रेपूर्वी भारतासह 14 देशांवर व्हिसा बंदी

हज यात्रेकरुसांठी एक धक्कादायक बातमी आहे. सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तानसह 14 देशांवर व्हिसा बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2025 | 06:16 PM
Saudi Prince MBS orders visa ban on 14 nations ahead of Hajj

Saudi Prince MBS orders visa ban on 14 nations ahead of Hajj

Follow Us
Close
Follow Us:

रियाध: हज यात्रेकरुसांठी एक धक्कादायक बातमी आहे. सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तानसह 14 देशांवर तात्पुरती व्हिसा बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे व्यापार, कौटुंबिक भेटी आणि उमराह व्हिसावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला आहे. हज यात्रेसाछी नोंदणी न करता येणाऱ्या यात्रेकरुंना रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

ही व्हिसा बंदी अस्थायी स्वरुपाची आहे. हज यात्रेच्या हंगामापर्यंत म्हणज जूनच्या मध्यापर्यंत ही व्हिसाबंदी लागू करण्यात येणार आहे. हज यात्रनंतर व्हिसा प्रक्रिया पुन्हा पूर्ववत केली जाणार असल्याचे सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅनडाच्या संसदेमध्ये राडा! अज्ञात व्यक्तीच्या घुसखोरीने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; संचार बंदी लागू

निर्णयामागे कारण

सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी नागरिकांना 13 एप्रिलपर्यंत उमराह व्हिसावर देशात प्रवेश करण्यास परवानगी आहे. 13 एप्रिलनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान  झालेल्या गर्दीत सुमारे 1000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्य झाला होता. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृतपणे नयात्रेसाठी आलेल्या लोकांचा समावेश होता.

दरवर्षी लाखो मुस्लिम आणि श्रद्धाळू लोक सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जातात. इस्लामच्या पवित्र स्थळांपैकी एक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियात भाविकांची प्रचंड गर्दी जमते. यामुळे सुरक्षितता आणि व्यपस्थापन सुलभ करण्यासाठी सौदी अरेबिया सरकारने कठोर निर्णय घेत व्हिसा बंदी लागू केली आहे.

व्हिसा बंदीचा परिणाम

सौदी अरेबियाच्या या व्हिसाबंदीच्या निर्णयाने भारत, बांगलादेश, पाकिस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, नायजेरिया, इराक जॉर्डन अल्जेरिया, सूदान इथियोपिया ट्युनिशिया आणि येमेन या देशांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे हजारो भाविकांच्या योजना प्रभावित होण्याची शक्यता आहे.

प्रवास अधिक सुलभ आणि नियंत्रित

सौदी अरेबियाच्या परराष्ट्री मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, व्हिसा बंदीचा निर्णय प्रवास प्रक्रिया अधिक सुलभ आणि नियंत्रित करण्यासाठी घेण्यात आला आहे. यामुळे हज यात्रेकरुंसाठी अधिक सुरक्षित व सोयीस्कर अनुभव प्राप्त होईल. हा निर्णय तात्पुरता घेण्यात आला आबे. भाविकांना नोंदणी करुनच हज यात्रा करण्याचे आवाहन सौदी अरेबियाच्या सरकारने केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ब्रिटन संतापला! इस्त्रायलने दोन महिला खासदारांना देशात प्रवेश नाकारला; नेमकं कारण काय?

Web Title: Saudi prince mbs orders visa ban on 14 nations ahead of hajj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Hajj Pilgrimage
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
2

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.