ब्रिटन संतापला! इस्त्रायलने दोन महिला खासदारांना देशात प्रवेश नाकारला; नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इस्त्रायलच्या सरकारने शनिवारी (05 एप्रिल) ब्रिटनच्या दोन खासदारांना देशाक प्रवेश नाकारला. दोन्ही खासदारांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. हे खासदार ब्रिटनच्या लेबर पार्टीते सदस्य युआन यांग आणि अब्तिसम मोहम्मद होत. या घटनेवर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री डेविड लॅमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून म्हटले आहे की, ब्रिटीश संसद सदस्यांसोबतचे अशा प्रकारचे वागणूक योग्य नाही आम्ही ते खपवून घेणार नाही.
इस्त्रायलच्या या कृत्याने मोठी खळबळ उडाली आहे. यांग हे ईर्ली आणि वुडली मतदारसंघाचे खासदार आहेत, तर मोहम्मद जोशेफील्ड हे सेंट्रल मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. दोन्ही खासदार इस्त्रायलमध्ये संसदीय प्रतिनिधीमंडळाता भाग म्हणून गेले होते. मात्र, इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विमानतळावरच अडवून ठेवले. इस्त्रायल सरकारने आरोप केला आहे की, दोन्ही खासदार इस्त्रायलच्या सुरक्षादलांच्या हालचाली डॉक्युमेंट करण्याच्या आणि इस्त्रायलविरोधी भावना पसरवण्याच्या उद्देशाने देशात आले होते.
ब्रिटनमध्ये या प्रकरणानंतर संतापाची तीव्र लाट उसळली आहे. अनेकांनी या घटनेचा तीव्र विरोध केला आहे. परराष्ट्री मंत्री लॅमी यांनी कठोर शब्दांत स्पष्ट केले आहे की, हा ब्रिटिश संसंदेचा अपमान आहे. अशा प्रकारचे कृत्य अन्याय आहे, हे मान्य केले जाणार नाही. त्यांनी असेही म्हटले की, इस्त्रायल सरकारला यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सरकार दोन्ही खासदारांच्या संपर्कात आहे. त्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे.
सध्या या प्रकरणामेग दोन मुख्य कारणे असल्याचे म्हटले जात आहे. पहिले दोन्ही खासदारांवर इस्त्रायलने केलेले गंभीर आरोप, यामध्ये दोन्ही खासदार इस्त्रायलच्या सुरक्षादलांच्या हालचाली डॉक्युमेंट करण्याच्या आणि इस्त्रायलविरोधी भावना पसरवण्याच्या उद्देशाने देशात आले होते असे म्हटले आहे. दुसरे म्हणजे इस्त्रायलचा उद्देश केवळ शांती प्रक्रियेला मदत करणे हाच होता आणि ही एक नियमित संसदीय भेट होती.
सध्या या प्रकरणानंतर ब्रिचन आणि इस्त्रायलच्या राजनैतिक संबंधांमध्ये ताणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनने हे कृत्य असंवेदनशील आणि अस्वीकार्य असल्याचे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळो दोन्ही देशांत राजनैतिक पेच निर्माण झाला आहे. सध्या ब्रिटन आणि इस्त्रायलमध्ये संवाद सुरु असून हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या घटनेमुळे ब्रिटनमध्ये सर्वसामान्यांमध्ये नाराजीता सूूर दिसून येत आहे. सध्या इस्त्रायल सरकार या प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.