कॅनडाच्या संसदेमध्ये राडा! अज्ञात व्यक्तीच्या घुसखोरीने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; संचार बंदी लागू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: कॅनडातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनडाच्या ओटावा शहराच्या संसद भवनमध्ये शनिवारी (05 एप्रिल) दुपारी एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला. यामुळे देशात प्रचंड खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, संसद भवनाच्या पूर्व भवनाच्या ब्लॉकमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संचार बंदी जाहीर करण्यात आले. तसेच वेलिंग्टन स्ट्रीट परिसरात नाकाबंदी करण्यात आली.
पोलिसांनी नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचा, बरवाजे बंद करण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी विशेष दल तैनात केले आहेत. तसेच अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी शोधमोही सुरु केली आणि काही तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर रविवारी सकाळी संशयिताला अटक करण्यात आली. दरम्यान अटक केलेला युवक को आहे, त्याचा हेतू काय होता याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या या घटनेटी सखोल चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. युकवकाची पार्श्वभूमी तपासली जात आहे.
पोलिसांनी शनिवारी दुपारी 2:45 वाजता ओटावामध्ये अर्लट जारी केला होता. अलर्टमध्ये संसद भवनात असलेल्या लोकांना आसपासच्या खोल्यांमध्ये लपण्याचा सल्ला, दरवाजे बंद करुन कुलूप लावण्याचा सल्ला देण्यात आला. पोलिसांच्या सावधगिरीमुळे आणि तत्परेतमुळे कोणतीही जीवितहानी घडली नाही.
पूर्व ब्लॉकचा भाग विशेष करुन सीनेटर आणि त्यांच्या स्टाफच्या कार्यलयांसाठी वापरण्यात येतो. तसेच कॅनडाच्या संसद आगामी संघीय निवडणुकांपूर्वी भंद करण्यात आली होती. यामुळे फारसे सदस्य उपस्थित नव्हते. यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.
सध्या या घटनेमुळे संपूर्ण कॅनडामध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. संसद परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तपासात अडथळा येऊ नये म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेमुळे संसदेसारख्या उच्च सुरक्षा असलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सरकारने घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सुरक्षाव्यवस्थेत सुधार करण्याचेही आदेश दिले आहे. नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण असून आवाजा उठला जात आहे.