Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शास्त्रज्ञांनी लावला क्रांतिकारी शोध; ‘या’ धातूला चक्क केले सोन्यात रूपांतरित

या महत्त्वपूर्ण शोधामुळे सोन्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर सखोल प्रकाश टाकला गेला आहे. शास्त्रज्ञांना भूकंपामुळे जमिनीखाली सोन्याचे साठे कसे तयार होतात, हे समजले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 08, 2025 | 03:33 PM
Scientists at Monash University have discovered how quartz turns into gold

Scientists at Monash University have discovered how quartz turns into gold

Follow Us
Close
Follow Us:

कॅनबेरा : मोनाश विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पृथ्वीखाली दडलेल्या खजिन्याचा रहस्यभेद केला आहे. त्यांनी क्वार्ट्जमधून सोने तयार होण्याची प्रक्रिया उलगडली असून, यासंदर्भातील संशोधन नेचर जिओसायन्स या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे सोन्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेबाबतचे अनेक अनुत्तरित प्रश्न स्पष्ट झाले आहेत.

‘गोल्ड नगेट पॅराडॉक्स’चा शोध
नेचर जिओसायन्समध्ये प्रकाशित ‘गोल्ड नगेट पॅराडॉक्स’ या संशोधनात, भूकंप आणि क्वार्ट्जमधील सोन्याच्या निर्मितीची प्रक्रिया तपशीलवार मांडण्यात आली आहे. भूकंपाच्या ताणामुळे सोन्याचे मोठे तुकडे कसे तयार होतात, याविषयी शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. मोनाश विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भूकंपाच्या ताणाचे अनुकरण करून प्रयोगादरम्यान क्वार्ट्जमधून सोने काढले.

भूकंप आणि पायझोइलेक्ट्रिक प्रभावाचा परिणाम

संशोधकांच्या मते, भूकंपादरम्यान क्वार्ट्जच्या विवरांमध्ये निर्माण होणाऱ्या उच्च दाबामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते. यामुळे पायझोइलेक्ट्रिक व्होल्टेज निर्माण होतो, जो क्वार्ट्जमध्ये तरंगत असलेल्या सोन्याच्या कणांसाठी मुख्य कारण ठरतो. याच प्रक्रियेमुळे क्वार्ट्जमधील सोने वेगळे होते आणि त्याचे मोठे तुकडे तयार होतात. भूकंपाच्या ताणामुळे निर्माण झालेल्या दाबाने क्वार्ट्जमध्ये क्रॅक तयार होतात. या विवरांमध्ये हायड्रोथर्मल द्रवपदार्थ प्रवेश करतात आणि त्याद्वारे सोने तयार होते. ही प्रक्रिया पृथ्वीच्या खाली खोलवर घडते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ड्रॅगनला जगात विनाशच घडवायचा आहे का? ‘या’ मोठ्या कारणामुळे नासाने दिला निर्वाणीचा इशारा

सोन्याच्या साठ्यांचा शोध लावण्यास मदत

या संशोधनामुळे सोन्याचे नवीन साठे शोधण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पायझोइलेक्ट्रिक प्रभावाचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना सोन्याच्या साठ्यांची संभाव्य ठिकाणे शोधता येऊ शकतात. यामुळे सोन्याच्या शोधासाठी नवी तंत्रे विकसित करण्याची दारे उघडली आहेत.

क्वार्ट्जचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये

क्वार्ट्ज हे सिलिकॉन आणि ऑक्सिजनपासून बनलेले स्फटिकासारखे खनिज असून, ते पृथ्वीच्या अंतर्गत थरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. भूकंप आणि हायड्रोथर्मल प्रक्रिया यांच्या साहाय्याने क्वार्ट्ज सोन्यात बदलू शकते, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : फ्लोरिडा ते अलास्का… अमेरिकेने 222 वर्षात ‘ही’ जागा घेतली विकत, किंमत पाहून व्हाल थक्क

सोन्याचे जागतिक साठे

जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. अमेरिकेत 8,133 टन सोने आहे, तर भारत 840 टन सोन्याच्या साठ्यासह नवव्या क्रमांकावर आहे. या संशोधनामुळे भविष्यात भारतासह इतर देशांना सोन्याचे नवे साठे शोधण्यात मदत होऊ शकते.

संशोधनाचा भविष्यातील प्रभाव

या महत्त्वपूर्ण शोधामुळे सोन्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर सखोल प्रकाश टाकला गेला आहे. शास्त्रज्ञांना भूकंपामुळे जमिनीखाली सोन्याचे साठे कसे तयार होतात, हे समजले आहे. हे संशोधन सोन्याच्या अर्थशास्त्रासाठीही महत्त्वाचे ठरणार असून, यामुळे सोन्याच्या साठ्यांच्या शोधाला नवी दिशा मिळेल. मोनाश विद्यापीठातील या अभ्यासाने भूकंप, खनिज विज्ञान आणि सोन्याच्या रसायनशास्त्रातील नवे दालने उघडली आहेत. या शोधामुळे पृथ्वीखाली दडलेल्या संपत्तीच्या रहस्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

Web Title: Scientists at monash university have discovered how quartz turns into gold nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.