Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Seattle Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये ‘स्पेस नीडल’जवळ फूड फेस्टिव्हलदरम्यान अंधाधुंद गोळीबार; दोन जणांचा मृत्यू, 5 जखमी

Seattle Gunfire: अमेरिकेत स्पेस नीडलजवळ एका वार्षिक खाद्य महोत्सवात झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. पोलीस तपास सुरू आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 27, 2026 | 11:58 AM
seattle shooting bite of seattle food festival space needle marathi news

seattle shooting bite of seattle food festival space needle marathi news

Follow Us
Follow Us:
  • ‘बाइट ऑफ सिएटल’ महोत्सवात भीषण गोळीबार
  • २ जणांचा जागीच मृत्यू, २ वर्षांच्या बालकासह ५ जखमी
  • दोन संशयित ताब्यात, एफबीआय व पोलिसांचा संयुक्त तपास

अमेरिकेतील (America) वॉशिंग्टन राज्यातील सिएटल शहरात रविवारी संध्याकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना घडली. शहरातील सर्वात प्रमुख पर्यटन स्थळ मानल्या जाणाऱ्या ‘स्पेस NEEDLE’ च्या अगदी जवळ असलेल्या सिएटल सेंटर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध वार्षिक ‘बाइट ऑफ सिएटल’ (Bite of Seattle) अन्न महोत्सवामध्ये अचानक अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामुळे परिसरात प्रचंड पळापळ आणि घबराट पसरली. या रक्तरंजित घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन वर्षांच्या चिमुकल्यासह ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

वार्षिक ‘बाइट ऑफ सिएटल’ हा उत्सव अन्न, संस्कृती आणि संगीताचा आनंद लुटण्यासाठी अत्यंत लोकप्रिय मानला जातो आणि दरवर्षी इथे हजारो नागरिक जमतात. रविवारी संध्याकाळी सुमारे ६ वाजता जेव्हा नागरिक आणि पर्यटक या महोत्सवाचा आनंद घेत होते, तेव्हा अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आला. सुरुवातीला उपस्थितांना फटाके फोडले जात असल्याचा भास झाला, परंतु लगेचच लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार लोकांची तुडवंबड झाली, लहान मुलांच्या गाड्या उलटल्या आणि काही क्षणांतच आनंदाचे वातावरण भयाच्या सावटाखाली आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

२ वर्षांच्या चिमुकल्यासह ५ जण गंभीर जखमी

सिएटल अग्निशमन विभाग आणि तातडीच्या मदत पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. दोन नागरिकांचा गंभीर जखमांमुळे जागीच मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी घोषित केले. इतर जखमींमध्ये एका २ वर्षांच्या लहान मुलाचा, २३ वर्षांचा तरुण आणि तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ हरबरव्ह्यू मेडिकल सेंटरमध्ये (Harborview Medical Center) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, जिथे एका ५६ वर्षीय महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सिएटल पोलीस दलासह फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) आणि ब्यूरो ऑफ अल्कोहोल, टोबॅको, आर्म्स अँड एक्स्प्लोसिव्ह्स (ATF) च्या पथकांनी तातडीने संपूर्ण सिएटल सेंटर परिसर सील केला. सुरक्षेच्या कारणास्तव सिएटल सेंटर कडे जाणारी मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्यात आली.

🚨 VIDEO: A person has been taken into custody after a reported multi-victim shooting at the Bite of Seattle festival at Seattle Center. Authorities remain on scene as the investigation continues. More details as they become available. 🚔 pic.twitter.com/Z0JCqX3xn9 — Chad Ledger (@TheChadLedger) July 27, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NATO Spy: नाटोच्या सर्वात सुरक्षित तळाला खिंडार! ‘शेप’ मुख्यालयातून गुप्त माहिती चोरीचा प्रयत्न; ‘या’ देशाची महिला इंटर्न ताब्यात

दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, तपास वेगाने सुरू

घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी वेगाने शोधमोहीम राबवली. ताज्या माहितीनुसार, सिएटलच्या महापौर केटी विल्सन यांनी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची पुष्टी केली आहे. हा गोळीबार वैयक्तिक वादातून झाला की यामागे काही मोठा कट होता, यादृष्टीने पोलीस प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या महोत्सवांमध्ये वारंवार होणाऱ्या अशा गोळीबाराच्या घटनांमुळे तेथील गन कल्चर (Gun Culture) आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना सध्या या परिसरापासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Seattle shooting bite of seattle food festival space needle marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • America
  • Shooting
  • World news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
1

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष
2

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
3

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL
4

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.