Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवैध स्थलांतरितांची दुसरी तुकडी लवकरच पोहोचणार; ‘इतके’ भारतीय परतणार मायदेशी

अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, पुन्हा एकदा अनेक भारतीयांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2025 | 11:32 AM
Second batch of illegal immigrants to arrive soon from US; 119 Indians to return home

Second batch of illegal immigrants to arrive soon from US; 119 Indians to return home

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, पुन्हा एकदा अनेक भारतीयांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता लवकरच भारतीय अवैध प्रवाशांची दुसरी तुकडी अमृतसर येथे पोहोचणार आहे. शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री 10 वाजेपर्यंत अमेरिकेचे लष्करी विमान दुसरी तुकडीच्या 119 अवैध भारतीयांना घेऊन पोहोचणार आहे.

या तुकडीत सर्वाधिक अवैध प्रवासी पंजाबचे 67 जण आहेत. त्यानंतर हरियाणाचे 33 लोक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय गुजरातमधील 8, उत्तर प्रदेशातील 3, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील प्रत्येकी 2 आणि हिमाचल प्रदेश व जम्मू-कश्मीरमधून प्रत्येकी 1 जण या जत्थ्यात आहेत. हे सर्व प्रवासी अमेरिकेतून जबरदस्तीने परत पाठवले जात असल्याचे म्हटले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त धोरण अन् युएस लष्करातून ‘Transgender’ बाहेर

दुसरे सर्वात मोठे डिपोर्टेशन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर  हे दुसरे मोठे डिपोर्टेशन होणार आहे. यापूर्वी, महिन्याच्या सुरुवातीस 104 अवैध भारतीय प्रवासी अमृतसरला परत आणले गेले होते. हे डिपोर्टेशन करण्याची प्रक्रिया अमेरिका अनेक वर्षांपासून करत आहे.

यावर भारताच्या संसदेत मोठा गदारोळ झाला होता. विरोधी पक्षांनी भारतीयांना बेड्या आणि हातकड्या घातल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत स्पष्टीकरण दिले होते की ही प्रक्रिया नवीन नाही. त्यांनी दरवर्षीचे आकडेही सादर केले होते.

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, अवैध भारतीयांना परत घेण्यासाठी भारत तयार आहे. ही केवळ भारताची नाही तर एक जागतिक समस्या आहे. कोणत्याही देशात अवैधरित्या राहणाऱ्यांना कायदेशीर हक्क नाहीत, यामुळे असे नागरिक त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जातात, हे स्वाभाविक आहे.

पंजाबची केंद्र सरकरावर टीका

मात्र, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकरावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंजाबमध्ये परत आणलेल्या प्रवाशांचा विमान उतरणे म्हणजे पंजाबची बदनामी केल्यासारखे आहे. त्यांनी केंद्र सरकारवर पंजाबविरोधी धोरण आखल्याचा आरोप केला आहे.

अवैध अप्रवासी भारतीयांचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत असून राजकीय वाद वाढत आहेत. परंतु, परदेशात अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांची परतावा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना अधिक सामंजस्याने काम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जागितक घडामोडी संबंधित बातम्या- पाहा पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टचे अवकाशातून दिसणारे विहंगमय दृश्य, नासाने जारी केला फोटो

Web Title: Second batch of illegal immigrants to arrive soon from us 119 indians to return home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Illegal immigration
  • World news

संबंधित बातम्या

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
1

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
2

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.