Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

Chicago Temple Shooting: अमेरिकेतील अरोरा येथील हिंदू मंदिरावर हल्ला करण्याचा कथित प्रयत्न अयशस्वी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताची रायफल अडकली होती आणि एका सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनंतर त्याला अटक करण्यात आली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 15, 2026 | 12:36 PM
Chicago Hindu Temple Shooting Plot Aurora Illinois Hindu Temple Threat

Chicago Hindu Temple Shooting Plot Aurora Illinois Hindu Temple Threat

Follow Us
Follow Us:
  • ऐनवेळी बंदूक अडकल्याने मोठा अनर्थ टळला
  • सहकाऱ्याच्या सतर्कतेमुळे आरोपीला अटक
  • दहशतवादी धमक्या आणि शस्त्रास्त्रांचा साठा

अमेरिकेतून (Chicago Temple) एक अत्यंत थरकाप उडवणारी आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. शिकागो शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या अरोरा (Aurora) भागातील एका प्रसिद्ध हिंदू मंदिराला लक्ष्य करून मोठा सामूहिक गोळीबार करण्याचा भीषण कट आखण्यात आला होता. नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरू होण्याच्या अगदी पूर्वसंध्येला हा हल्ला करण्याचे आरोपीचे नियोजन होते. मात्र, सुदैवाने आरोपीने बंदुकीचा ट्रिगर ओढताच त्याची रायफल तांत्रिक बिघाडामुळे अडकली (Jammed) आणि एक मोठा नरसंहार टळला. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय आणि हिंदू समाजात तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शिकागोजवळील अरोरा येथील हिंदू मंदिरावर हल्ल्याचा कट

स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय संशयिताचे नाव अलेक्झांड्रोस पापोराकिस (Alexandros Paporakis) असे आहे. आरोपीने स्वतःची ओळख ‘श्वेतवर्णीय वर्चस्ववादी’ (White Supremacist) आणि ‘नव-नाझी’ (Neo-Nazi) कट्टरपंथी विचारांचा समर्थक म्हणून दिली आहे. तो गेल्या काही दिवसांपासून अरोरा परिसरातील हिंदू मंदिरांवर पाळत ठेवून होता. धार्मिक उत्सवाच्या काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, हीच संधी साधून जास्तीत जास्त लोकांना लक्ष्य करण्याचा त्याचा भयंकर इरादा होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

सहकाऱ्याला फोन अन् पोलिसांची धडक कारवाई

हल्ल्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आरोपी अलेक्झांड्रोस घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर रविवारी त्याने एका फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला मेसेज पाठवून फोन करण्यास सांगितले. फोनवरील संभाषणात त्याने उघड केले की, तो मंदिरात गोळीबार करण्यासाठी गेला होता, परंतु त्याची रायफल चालली नाही. इतकेच नाही तर, “हिंदूंना आणि भारतीयांना ठार मारण्याची हीच योग्य वेळ आहे आणि मी आता थांबू शकत नाही,” अशा हिंसक भावना त्याने व्यक्त केल्या.

🚨 19-YEAR-OLD ARRESTED IN US OVER ALLEGED PLOT TO ATTACK HINDU TEMPLE Alexandros Paporakis (19) of Palatine, Illinois has been arrested for allegedly plotting a mass shooting targeting a Hindu place of worship in the Aurora area near Chicago. Authorities recovered a white supremacist manifesto containing references to violence against people of Indian descent. A Cook County judge ordered him detained with the next court hearing set for October 30. #US #Chicago #Aurora #HinduTemple https://t.co/Q5LSyQWbXf — contentkikamii (@contentkikamii) October 15, 2026

credit – social media and Twitter

त्याच्या सहकाऱ्याने या संभाषणाचे गांभीर्य ओळखून अजिबात विलंब न करता तातडीने माउंट प्रॉस्पेक्ट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सूत्रांचे जाळे विणून पॅलाटाईन येथील आरोपीच्या घराबाहेर सापळा रचला आणि त्याला अटक केली. रोलिंग मेडोज काउंटी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी आरोपीला ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

घराच्या झाडाझडतीत शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

अटक झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता थक्क करणारी माहिती समोर आली. त्याच्या घरातून एक सेमी-ऑटोमॅटिक रायफल, भरलेले मॅगझिन, शेकडो जिवंत काडतुसे आणि बुलेटप्रूफ बॉडी आर्मर जप्त करण्यात आले. या बॉडी आर्मरवर नव-नाझी आणि श्वेतवर्णीय अतिरेकी संघटनांशी संबंधित चिन्हे आणि चित्रे रेखाटलेली होती. पोलीस प्रशासनाने न्यायालयात सांगितले की, “या धोक्याचे गांभीर्य अत्यंत स्पष्ट आहे; जर बंदूक अडकली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.”

दरम्यान, न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी आणि स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे भारतीय दूतावासाने कौतुक केले आहे. तसेच, अमेरिका प्रशासनाकडून परिसरातील सर्व हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली असून भारतीय समुदायाला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिकागोतील हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न कुठे आणि कोणी केला?

    Ans: शिकागोजवळील अरोरा (Aurora) येथील हिंदू मंदिरावर अलेक्झांड्रोस पापोराकिस नावाच्या १९ वर्षीय नव-नाझी तरुणाने हल्ल्याचा प्रयत्न केला.

  • Que: आरोपीला पोलिसांनी कसे पकडले?

    Ans: आरोपीने आपल्या सहकाऱ्याला फोनवर हल्ल्याच्या अपयशी प्रयत्नाबद्दल सांगितले, ज्यानंतर सहकाऱ्याने तातडीने पोलिसांना खबर देऊन त्याला अटक करवली.

  • Que: आरोपीकडून पोलिसांनी कोणती शस्त्रे जप्त केली आहेत?

    Ans: पोलिसांनी आरोपीच्या घरातून एक रायफल, भरलेले मॅगझिन, शेकडो काडतुसे आणि नव-नाझी चिन्हे असलेले बॉडी आर्मर जप्त केले आहे.

Web Title: Chicago hindu temple shooting plot foiled suspect arrested aurora hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • America
  • Hindu
  • threatens
  • World news

संबंधित बातम्या

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
1

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Air France: फ्लायदुबई घटनेनंतर, फ्रान्सने  केली पाकिस्तानच्या वैमानिकांवर कारवाई; इस्रायलला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर घातली बंदी
2

Air France: फ्लायदुबई घटनेनंतर, फ्रान्सने केली पाकिस्तानच्या वैमानिकांवर कारवाई; इस्रायलला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर घातली बंदी

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
3

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
4

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.