Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Elon Musk : युक्रेनमधील लष्करी कारवाईदरम्यान स्टारलिंकचे इंटरनेट अचानक मंदावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. युक्रेन आणि पोलंडने इलॉन मस्क आणि त्यांच्या कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 15, 2026 | 04:16 PM
Elon Musk Starlink Ukraine controversy Starlink internet speed slowdown Ukraine

Elon Musk Starlink Ukraine controversy Starlink internet speed slowdown Ukraine

Follow Us
Follow Us:
  • स्टारलिंक इंटरनेट सेवा अचानक मंदावली
  • पोलंडची मस्क यांच्यावर कडक टीका
  • परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्वाचा प्रश्न

जगातील अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) आणि त्यांची सॅटेलाइट इंटरनेट कंपनी ‘स्टारलिंक’ (Starlink) सध्या मोठ्या आंतरराष्ट्रीय वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून इलॉन मस्क यांनी केंद्र सरकार आणि रिलायन्स ग्रुपवर गंभीर आरोप करत गदारोळ माजवला होता. मात्र आता खुद्द मस्क आणि त्यांची ‘स्पेसएक्स’ (SpaceX) कंपनी एका नव्या आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय संकटात सापडली आहे. युक्रेनमधील लष्करी कारवाईदरम्यान अचानक स्टारलिंक सेवा मंदावल्याने युक्रेन आणि पोलंडने इलॉन मस्क यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. युद्धासारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगी एका खाजगी कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पोलंडपासून युक्रेनपर्यंत… मस्कच्या स्टारलिंकभोवती वादाचे सावट, त्यावर कोणी विश्वास कसा ठेवू शकेल?

युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ आणि १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री युक्रेनियन सैन्याने आयोजित केलेल्या एका महत्त्वाच्या लष्करी सरावादरम्यान स्टारलिंक इंटरनेटचा वेग अचानक प्रचंड प्रमाणात कमी करण्यात आला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे तंत्रज्ञान सल्लागार सर्गेई बेस्क्रेस्नोव्ह यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कंपनीने या बदलाबाबत युक्रेनला कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. इंटरनेटचा वेग अचानक कमी झाल्यामुळे मध्यम पल्ल्याच्या हल्ला करणाऱ्या ड्रोनचे नियंत्रण, इंटरसेप्टर सिस्टीम, लष्करी रसद पुरवठा (Logistics) आणि थेट पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांना मोठा फटका बसला. युद्धाच्या मैदानात संदेशवहन तुटल्याने युक्रेनियन सैन्याला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती.

पोलंडची मस्क यांच्यावर जोरदार टीका आणि सुरक्षेची चिंता

या घटनेनंतर केवळ युक्रेनच नव्हे, तर युरोपमधील त्याचा प्रमुख सहकारी देश पोलंड देखील अत्यंत आक्रमक झाला आहे. पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकोरस्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट इलॉन मस्क यांना टार्गेट करत कडक शब्दांत टीका केली. सिकोरस्की यांनी विचारले की, इलॉन मस्क पुन्हा एकदा स्वतःच्या उत्पादनांचे आणि तंत्रज्ञानाचे राजकारण करत आहेत का? युरोपमधील सर्वच देश आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक या घडामोडींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, युद्धाच्या सुरुवातीपासून युक्रेन वापरत असलेल्या स्टारलिंक इंटरनेट सबस्क्रिप्शनचे बिल पोलंड सरकार भरत आले आहे. त्यामुळे पोलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केलेली चिंता ही अत्यंत रास्त आणि गंभीर मानली जात आहे. जर एखाद्या देशाची संपूर्ण लष्करी दळणवळण व्यवस्था एखाद्या परदेशी खाजगी कंपनीवर अवलंबून असेल, तर आणीबाणीच्या आणि युद्धाच्या प्रसंगी ती कंपनी किती विश्वासार्ह ठरू शकते? सेवा अटींमध्ये (Terms of Service) अचानक बदल करून एका क्लिकवर इंटरनेट बंद किंवा मंद केले जात असेल, तर देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Zelensky literally begs Elon Musk to switch on STARLINK or thousands of Ukrainians will die! He accuses Trump and Musk of betraying Ukraine, claiming Starlink’s overnight disruption crippled interceptor drones that rely on the satellite network, putting Ukrainian lives at risk. The same Starlink they wanted in India and Rahul & opposition were all out supporting! — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) October 14, 2026

credit – social media and Twitter

इलॉन मस्क यांचा खुलासा आणि अमेरिकी सरकारची भूमिका

या संपूर्ण वादानंतर इलॉन मस्क यांच्याकडूनही स्पष्टीकरण समोर आले आहे. मस्क यांच्या दाव्यानुसार, लष्करी वापरासाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्टारशील्ड’ (Starshield) या विशेष सॅटेलाइट नेटवर्कवर थेट अमेरिकन सरकारचे नियंत्रण असते. इंटरनेटचा वेग कमी करणे किंवा वापराच्या मर्यादा ठरवणे हे निर्णय अमेरिकी लष्कराकडून (US Military) घेतले जातात, असा दावा मस्क यांनी केला आहे. यासाठी त्यांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जबाबदार धरले आहे. तथापि, हे निर्बंध नेमके कोणी, का आणि कोणत्या परिस्थितीत लादले, यावर अमेरिकन प्रशासनाकडून किंवा पेंटागॉनकडून अद्याप कोणतेही अधिकृत सार्वजनिक स्पष्टीकरण जारी करण्यात आलेले नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

दुसरीकडे, या वादात मस्क यांच्या समर्थनार्थही काही महत्त्वाचे युक्तिवाद समोर येत आहेत. समर्थकांच्या मते, स्पेसएक्स ही एक खाजगी व्यापारी कंपनी आहे आणि युक्रेनच्या प्रत्येक लष्करी मागणीचे किंवा आक्रमक धोरणाचे पालन करण्यास ती कायद्याने बांधील नाही. युद्धाच्या सुरुवातीच्या अत्यंत कठीण काळात, जेव्हा रशियाने युक्रेनच्या सर्वच पारंपरिक टेलिकॉम नेटवर्कवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले होते, तेव्हा स्टारलिंकनेच युक्रेनला मोफत इंटरनेट देऊन संपर्क यंत्रणा जिवंत ठेवली होती. त्यामुळे आपल्या तंत्रज्ञानाचा वापर युद्धासाठी कसा व्हावा, यावर मर्यादा घालण्याचा अधिकार कंपनीला आहे, असा युक्तिवादही केला जात आहे.

युरोपची तांत्रिक आत्मनिर्भरता आणि परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व

हा संपूर्ण मुद्दा आता केवळ इलॉन मस्क आणि युक्रेन पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर यामुळे संपूर्ण युरोपियन युनियन आणि इतर विकसनशील देशांच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेवर (Strategic Autonomy) मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. रशियन हल्ले आणि आंतरराष्ट्रीय राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर स्टारलिंक चालवताना स्पेसएक्सलाही अनेक तांत्रिक आणि सुरक्षेच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु, राष्ट्रीय सुरक्षेसाठी परदेशी आणि खाजगी डिजिटल पायाभूत सुविधांवर अति-अवलंबित्व किती घातक ठरू शकते, याचा धडा जगाला या घटनेतून मिळाला आहे.

या वादामुळे आता युरोपियन देश स्वतःचे स्वतंत्र सॅटेलाइट नेटवर्क तयार करण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची शक्यता आहे. तसेच, भारत आणि इतर देशांमध्ये देखील सॅटेलाइट इंटरनेट सेवा मंजुरी देताना सुरक्षेचे आणि स्थानिक नियंत्रणाचे नियम किती कडक असले पाहिजेत, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. इलॉन मस्क यांच्या या निर्णयामुळे भविष्यात जागतिक स्तरावर खाजगी तंत्रज्ञान कंपन्यांवर किती विश्वास ठेवायचा, यावर निश्चितच पुनर्विचार केला जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युक्रेन आणि पोलंडने इलॉन मस्क यांच्यावर कोणता मुख्य आरोप केला आहे?

    Ans: युक्रेनमधील लष्करी सरावादरम्यान कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय स्टारलिंक इंटरनेटचा वेग कमी करून लष्करी कामांमध्ये अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • Que: स्टारलिंक सेवेचा वेग मंदावल्याने युक्रेनला काय फटका बसला?

    Ans: युक्रेनियन सैन्याचे मध्यम पल्ल्याचे ड्रोन, इंटरसेप्टर सिस्टीम, निगराणी आणि लष्करी लॉजिस्टिक नेटवर्क विस्कळीत झाले.

  • Que: या वादावर इलॉन मस्क यांनी काय स्पष्टीकरण दिले आहे?

    Ans: मस्क यांच्या मते लष्करी वापरासाठीच्या 'स्टारशील्ड' नेटवर्कवर अमेरिकन लष्कराचे नियंत्रण असून इंटरनेटच्या वेगाबाबतचे निर्णय अमेरिकी प्रशासनाकडून घेतले जातात.

Web Title: Elon musk starlink controversy ukraine poland satellite internet slowdown hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • elon musk
  • Global Market
  • Starlink Internet Service
  • World news

संबंधित बातम्या

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
1

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
2

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Air France: फ्लायदुबई घटनेनंतर, फ्रान्सने  केली पाकिस्तानच्या वैमानिकांवर कारवाई; इस्रायलला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर घातली बंदी
3

Air France: फ्लायदुबई घटनेनंतर, फ्रान्सने केली पाकिस्तानच्या वैमानिकांवर कारवाई; इस्रायलला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर घातली बंदी

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
4

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.