
protest in support of Former PM Imran Khan
फातिमा जिना ते इम्रान खान… पाकिस्तानचे नेते ज्यांच्यावर लष्कराने लादला देशद्रोहाचा ठपका, जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, पीटीआय पक्षाने लाहौरमध्ये सरकारविरोधात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर शाहबाज सरकारने पीटीआयच्या नेत्यांवर लाहौरमध्ये प्रवेश बंदी लागू केली आहे. पीटीआय पक्षाने आरोप केला आहे की, सराकर जाणूनबुजन ही धरपकड करत असून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. वादग्रस्त आसिम कायद्याविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. पण हे आंदोलन होण्यापूर्वीच सरकार त्यामध्ये अडथळा निर्माण करत असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.
शिवाय काही दिवसांपूर्वी खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांच्याविरोधात हे आंदोलन होणार होते. विरोधकांच्या मते, आसिम कायदा हा लोकांचा आवाज दडपवण्यसाठी, कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी आणि माध्यमांनवर नियत्रंण ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. पीटीआयचे नेते मोईन रियाज कुरैशी यांनी म्हटले की, पंजाब पोलिसांनी लाहोरच्या मार्गावर कडेकोट बंदी केली होती. वरिष्ठ नेते आणि समर्थकांनाची वाहने शहरात दाऊ दिली नाहीत. पोलिसांची ही कारवाऊ आंदोलनकर्त्यांना दाबण्यासाठी असल्याचे कुरैशी यांनी म्हटले. तसेच यापूर्वी देखील इम्रान खानच्या समर्थकांनी आणि पीटीआय पक्षाने अनेक आंदोलने केली होती. परंतु सरकारी कारवाईमुळे सर्व आंदोलने अपयशी ठरली. सध्या या सर्व परिस्थितीमुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे.
सध्या माजी पंतप्रधान इम्रान खान रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात आहेत. २०२३ ऑगस्टपासून ते तुरुंगात असून त्यांना आता भ्रष्ट्राचाराच्या आरोपाखाली आणखी १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना देखील १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तोशखाना-२ भ्रष्टाचार प्रकरणात २०२१ मध्ये सौदी अरेबियाकडून मिळालेल्या भेटी(रिश्वत) संदर्भात हे प्रकरण जोडण्यात आले आहे. इम्रान खान आणि बुशरा बीबीवर आरोप आहे की, त्यांनी नियमांविरोधात जाऊन महागड्या भेटवस्तू ठेवल्या आहे. त्यानंतर सरकारची फसवणूक केली आहे. न्यायालयाने याला देशद्रोह मानले असून कठोर शिक्षा सुनावली आहे.
पाकचे माजी PM इम्रान खानला मोठा झटका; भ्रष्टाचार प्रकरणात १७ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा