Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेख हसीना बांगलादेशात परतणार? अंतरिम सरकारसमोर ठेवल्या ‘या’ अटी

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना देशात परतण्याच्या तयारीत आहे. परंतु त्यांनी ढाकासमोर काही अटी ठेवल्या आहेत. या अटी पूर्ण झाल्या तरच त्या आपल्या देशात परततील असे त्यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 12, 2025 | 09:50 PM
Sheikh Hasina

Sheikh Hasina

Follow Us
Follow Us:
  • शेख हसीना बांगलादेशता परतणार
  • ठेवल्या ३ अटी
  • मोहम्मद युनूसवर गंभीर आरोप
Sheikh Hasina Return To Bangladesh : ढाका : शेख हसीना (Sheikh Hasina) बांगलादेशात परतणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. तसेच त्यांनी बांगलादेशच्या अंमतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत.

‘बांगलादेश सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली नाही…’ ; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसबद्दल मोठा दावा

हसीना यांनी मायदेशी परतण्यास ठेवल्या तीन अटी

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हसीना यांनी म्हटले की, त्या बांगलादेशात परतण्यास तयार आहे. परंतु त्यांनी देशात पुन्हा लोकशाही पुनर्संचयित करण्यास सांगितली आहे. तसेच त्यांनी अवामी लीगवरील बंदी उठवण्याची आणि निष्पक्ष, समावेश निवडणुकांचा मादगणी केली आहे. तरच त्या मायदेशी परतणार असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे.

युनूस यांच्यावर गंभीर आरोप

दरम्यान हसीना यांनी पुन्हा एखदा युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. हसीना यांनी बांगलादेश आणि भारतातील बिघडलेल्या संबंधासाठी युनूस यांना जबाबदार धरले आहे. तसेच त्यांनी  युनूसच्या राजवटीत कट्टरपंथीं शक्तीं राज करत असल्याचा दावा केला आहे. हसीना यांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेश आणि भारतमधील संबंध युनूस यांच्या मुर्ख आणि चुकीच्या धोरणांमुळे बिघडले आहे. परंतु त्या बांगलादेशात परतल्या तर पुन्हा संबंध सुधारतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे. हसीना यांनी युनूस यांनी संविधानांच्या तरतूदींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे, तसेच त्यांनी देशात कट्टरपंथींच्या हिंसाचाराला न रोखल्याचा आरोपही केला आहे.

हसीना यांनी भारताचे मानले आभार

तसेच हसीना यांनी भारताचे आभार मानले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे अवामी सरकार पडले. तेव्हा हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. त्यांनी म्हटले की, मला आश्रय दिल्याबद्दल मी भारत सरकार आणि येथील लोकांची आभारी आहे.

बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. परंतु यापूर्वीच देशाच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. हसीना यांच्या आरोपांनी पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे.

बांगलादेशात युनूस सरकारविरोधात लोक रस्त्यावर

या सर्व घडामोडींंदरम्यान बांगलादेशात पुन्हा ऑगस्ट २०२४ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी युनूस सरकारविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयामुळे, ज्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये संगीत आणि शीरीरिक शिक्षण विषयांच्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत, यामुळे तीव्र आंदोलन पेटले आहे. तसेच १९९० पासून शिक्षकांच्या पगारात वाढ न झाल्याने, बेरोजगारी, वाढता हिंसाचार यांमुळे देखील रोषाचे वातावरण आहे.

Bangladesh News : बांगलदेशात निवडणुकीपूर्वी मोठा गोंधळ; शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर

Web Title: Sheikh hasina says return to bangladesh on 3 conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 09:50 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय
1

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी
2

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?
3

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका
4

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.