
Sheikh Hasina's Reaction After Dhaka Court Sentences Her To Death
Sheikh Hasina on her Death Sentence : ढाका : बांगलादेशातील (Bangladesh) आंतरराष्ट्रीय न्यायालयाने माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. यानंतर हसीना यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाचा हा निकाल एकांगी आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा संताप हसीना यांनी व्यक्त केला आहे.यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हसीना यांनी त्यांना बांगलादेशच्या गुन्हेगारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने(ICT) ने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, हा निकाल माझी बाजू न ऐकता जाहीर करण्याता ला आहे. अंतरिम सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या न्यायाधिकरणाने हा अधिकार दिला आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा जनादेश नाही. हा निकाल पूर्णत: राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हसीना यांचे सरकार पडले होते. यानंतर त्यांनी बांगलदेशमधून पळ काढला आणि भारतात आश्रय घेतला. याकाळात बांगलादेशात स्थापन झालेल्या अंतरिम सराकरेन त्यांच्यावर मानवीय गुन्ह्यांचे आरोप केले. त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला. अंतरिम चौकशी आयोगात २३ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. यानंतर आज निर्णायवर ICT ने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
शेख हसीना यांच्यावर १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर पोलिस आणि सुरक्षा दलांना प्राणघातक कारवाई करण्याचे आरोप करण्यात आले आहे. या आंदोलनात १,४०० हून अधिक मृत्यू झाले होते. त्यांच्या हत्येचा आरोप हसीना यांच्यावर करण्यात आला होता. एकूणच हसीना यांच्यावर हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येचा आणि लोकांना मारहाण केल्याचा आरोप होते. हसीनांवरील हे आरोप सिद्ध झाले असून त्यांना फाशीची शिक्षा ICT-BD ने सुनावली आहे.
परंतु हसीना यांनी दावा केला आहे की, निकाल एकांगी लागला असून त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. हसीना यांनी असाही दावा केला आहे की, न्याधिकरणाने त्यांच्यावरचे नव्हे, तर अवामी लीगच्या इतर सदस्यांवरही खटला चालवला आहे. परंतु या सर्वांमागे अनिर्वाचित सरकारचा हात आहे. सध्या न्यायाधिकरणाने माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. तसेच एका माजी पोलिस प्रमुखाला पाच वर्षांच्या तुरुंगवास सुनावला आहे.
शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर
Ans: बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाच्या निर्णयावर हसीना यांनी संताप व्यक्त केला असून हा निर्णय एकांगी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
Ans: शेख हसीनासह न्यायाधिकरणाने माजी गृहमंत्री असदुज्जमान खान आणि एका माजी पोलिस प्रमुखाला शिक्षा सुनावली आहे.
Ans: शेख हसीना यांच्यावर १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर पोलिस आणि सुरक्षा दलांना प्राणघातक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा आणि अमानवीय कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला होता.