फोटो सौजन्य: iStock
रोम: इटलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 22 वर्षाच्या एका बेबीसिटरला अटक करण्यात आली आहे. अटकेचे कारण तिने बागेत दोन नवजात बालकांचा मृतदेह पुरल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बागेत दोन नवजात बालकांचे मृतदेह पुरलेले आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, इटलीतील ट्रॅव्हर्सटोलो येथील व्हिलामध्ये घडलेल्या या भीषण घटनेनंतर सगळेच हैराण झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय बेबीसिटर चियारा पेट्रोलिनीला अटक केली आहे.
कुत्र्याला सापडला मृतदेह
विशेष बाब म्हणजे त्यावेळी ही बेबीसिटर तिच्या पालकांसोबत न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवत होती. त्या वेळी, पेट्रोलिनीच्या आजीच्या कुत्र्याला हे दोन मुलांचे मृतदेह सापडले अशी माहिती समोर आली आहे. मृतदेह सापडल्यानंतर त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. ज्यातून एका मुलाची आई पेट्रोलिनी असल्याचे उघड झाले. पेट्रोलिनीवर खून आणि मृतदेह लपविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याची माहिती इटलीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिनीने 7 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. यानंतर तिने मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. नंतर मृतदेह बागेत पुरून दोन दिवसांनंतर ती न्यूयॉर्कमध्ये कुटुंबासह सुट्टीसाठी घरातून पळून गेली. दुसऱ्या अपत्याची आई कोण आहे, याचा तपास सुरू आहे. वर्षभरापूर्वीच नवजात बालकांचा जन्म झाला होता.
पेट्रोलिनी इटलीतील एका विद्यालयात लॉ चे शिक्षण घेत आहे. सहसा ती घरीच असते. ती कॉलेज करत असताना पार्ट टाईम जॉब म्हणून बेबीसिटरचे देखील काम करते. ती स्थानिक चर्चमध्ये देखील मदत करते. पेट्रोलनीने गुगलवर ‘हाऊ टू ॲबॉर्ट’ सर्च केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पेट्रोलिनीच्या माजी प्रियकराने दावा केला आहे की ती गर्भवती असल्याची त्याला माहिती नव्हती. या घटनेने पोलिसही हैराण झाले आहेत.