अमेरिकेतील कॅलिफोर्निया (california) राज्यातील लॉस एंजेलिस( Los Angeles) शहरात झालेल्या हत्याकांडातील (firing) संशयित आरोपीने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी घेरल्यानंतर आरोपीने व्हॅनमध्ये स्वतःवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयिताला शोधून काढले आणि त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा ही घटना घडली. पोलिसांनी त्याच्या व्हॅनला घेरले, परंतु पोलिसांनी त्याला पकडण्याआधीच त्याने व्हॅनमध्ये स्वतःवर गोळी झाडली.
[read_also content=”रीलच्या वेडापायी तरुणीला बसला 17 हजारांचा फटका, भररस्त्यात रिल बनवणारीला वाहतूक पोलिसांनी घडवली अद्दल! https://www.navarashtra.com/latest-news/a-girl-fined-for-doing-reel-on-road-at-gaziabad-nrps-363732.html”]
या गोळीबारात आणखी संशयित नसल्याचे लॉस एंजेलिस पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, पोलीस तपास करत आहेत.
आरोपीने काही दिवसापुर्वी लॉस एंजेलिसमधील एका डान्स क्लबमध्ये बेछुट गोळीबार केला होता. ज्यात 10 लोक ठार झाले आणि 10 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉस एंजेलिसमधील मॉन्टेरी पार्कमध्ये ही घटना घडली होती. मॉन्टेरी पार्कमध्ये सुमारे 60,000 लोक राहतात आणि त्यापैकी बहुतेक आशियाई वंशाचे आहेत. चंद्र नववर्ष उत्सवानिमित्त ही घटना घडली. चंद्र नववर्ष हा चीनचा मुख्य सण आहे आणि दोन दिवस चालणारा हा उत्सव शनिवारीच सुरू झाला आहे. या उत्सवानिमित्त संशयित आरोपींनी डान्स क्लबमध्ये गोळीबार करून 10 जणांची हत्या केली. विशेष म्हणजे या महिन्यात अमेरिकेत गोळीबाराची ही पाचवी घटना आहे.
यापुर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. टेक्सासमधील उवाल्डे भागात शाळेत झालेल्या गोळीबारानंतरची ही सर्वात मोठी घटना असल्याच मानलं जात आहे. उवाल्डे घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला. तर, याआधी नुकतच कोलोरॅडो राज्यातील स्प्रिंग नाईट क्लबमध्ये गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता.