Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण कोरियामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार बर्फवृष्टी; चार लोकांचा मृत्यू

दक्षिण कोरियामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे दक्षिण कोरियामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्यीच नोंद करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 28, 2024 | 12:37 PM
दक्षिण कोरियामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार बर्फवृष्टी; चार लोकांचा मृत्यू

दक्षिण कोरियामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार बर्फवृष्टी; चार लोकांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

सियोल: दक्षिण कोरियामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे दक्षिण कोरियामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्यीच नोंद करण्यात आली आहे. तसेच, शेकडो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. नौका वाहतूकही स्थगित करण्यात आली असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1907 मध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर सियोलमध्ये ही तिसरी सर्वात जास्त हिमवृष्टी नोंदवली गेली आहे.

गुरुवारी सकाळी सियोलच्या काही भागांमध्ये 40 सेंटीमीटरपेक्षा अधिक बर्फवृष्टी झाली. यामुळे 140 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. मात्र, दिवसभरानंतर बर्फवृष्टी सुरू आहे. दक्षिण कोरियाच्या हवामान विभागच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियोलच्या महानगर क्षेत्रांमध्ये जोरदार बर्फपडण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काल रात्री झालेल्या बर्फवृष्टीत एकाचा अंगावर बर्फाने भरलेली जाळी पडून मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.आणखी एकाचा पार्किंमध्ये तंबू कोसळ्याने मृत्यू झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अल्पसंख्यांकांना लक्ष्य केल्याबद्दल हिंदू-अमेरिकन गट संतप्त; बांगलादेशावर निर्बंध लादण्याची मागणी

눈 대박이다… 버스 40분 남아서 역까지 걸어오고 전철도 지연되서 기다리는중.. 차들이 오르막길 못 올라가 버스도 사고나서 승객들 다.내림… pic.twitter.com/jZ1OnGVsYz

— 🇰🇷숼🇰🇷 (@sowol_sy) November 27, 2024


विभिन्न भागांत बर्फवृष्टीचा तडाखा

देशाच्या मध्य, पूर्व आणि दक्षिण-पश्चिम भागांमध्ये 10 ते 23 सेमी बर्फवृष्टी झाली आहे. 220 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सुमारे 90 नौकांना बंदरावर थांबण्याचा आदेश देण्यात आला. सोलच्या रस्त्यांवर साचलेल्या बर्फामुळे वाहतूक मंदावली होती. प्रशासन रस्त्यांवरील झाडे, पडलेले फलक आणि इतर अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.

याशिवाय देशाच्या पूर्वेकडील भागांमध्ये वाहतूक अपघात झाले असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.याशिवाय, गँगवॉन प्रांतातील वोंजू शहरात 53 वाहनांच्या ढिगाऱ्यात 11 जण जखमी झाल्याची माहितीसमोर आली आहे.

समुद्राच्या तापमानातील वाढ आणि थंड हवेचे प्रवाह वाढल्यामुळे

नोव्हेंबर महिन्यात या असामान्य बर्फवृष्टीचे कारण समुद्राच्या तापमानातील वाढ आणि थंड हवेचे प्रवाह असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे बर्फवृष्टीच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. सियोलमध्ये झालेली ही बर्फवृष्टी 1972 नंतरची सर्वाधिक भीषण बर्फवृष्टी असल्याचेही नोंदवले गेले आहे. या विक्रमी बर्फवृष्टीमुळे दक्षिण कोरियातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी जीवन ठप्प झाले आहे. प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच सियोल प्रांतातील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Hindu Violence: बांगलादेशात चिन्मय दास यांच्या अटकेवरून संघर्ष; एका वकिलाचा मृत्यू, तपासाचे आदेश

Web Title: South korea battles second day of heavy snow four dead nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • heavy snowfall
  • South korea
  • world

संबंधित बातम्या

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
1

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
2

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Trump Tarrif : दक्षिण कोरियाला दिलासा; अमेरिकेने ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी केला कर
3

Trump Tarrif : दक्षिण कोरियाला दिलासा; अमेरिकेने ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी केला कर

भारतीयांना का आहे या 7 देशात जाण्यास मनाई; परदेशी पर्यटनासाठी Travel Advisory वाचूनच योग्य तो निर्णय घ्या
4

भारतीयांना का आहे या 7 देशात जाण्यास मनाई; परदेशी पर्यटनासाठी Travel Advisory वाचूनच योग्य तो निर्णय घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.