Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण कोरियात विमान दुर्घटना ; नौदलाचे पी-३ जेट कोसळल्याने उडाली खळबळ

दक्षिण कोरियामध्ये एक विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण कोरियाच्या नौदलाचे गस्त घालणारे विमान पी-३ पोहांगच्या डोंगराळ परिसरात कोसळले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2025 | 02:35 PM
South Korea's Navy plane crashes in Pohang with 4 people on board

South Korea's Navy plane crashes in Pohang with 4 people on board

Follow Us
Close
Follow Us:

सियोल: दक्षिण कोरियामध्ये एक विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण कोरियाच्या नौदलाचे गस्त घालणारे विमान पी-३ पोहांगच्या डोंगराळ परिसरात कोसळले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानामध्ये चार लोक होते. परंतु अद्याप त्यांच्या बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दक्षिण कोरियाच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२९ मे) दुपारी ही घटना घडली.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या विमानातील लोकांचा शोध सुर आहे. विमानातील नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक वेळेनुसार, गुरुवारी दुपारी १.५० वाजता हा अपघात घडला. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान प्रशिक्षण उड्डाणावर होते. पोहांगमधील नागरिकांना लष्करी तळाजवळील डोंगराळ भागात धूराचे लोट दिसून आहे. यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Elon Musk चा ट्रम्प प्रशासनाला रामराम! सरकारी कार्यक्षमता विभागातून स्वत:ला केले पदमुक्त

Just in – Naval Aircraft Crash in Pohang, South Korea A naval patrol plane with four people aboard has crashed in Nam-gu, Pohang. Authorities have confirmed the incident, while the Navy reports that a military aircraft went down and damage is currently being assessed. Emergency… https://t.co/1xSAoAdKML pic.twitter.com/HfqBaiYsWU — Weather Monitor (@WeatherMonitors) May 29, 2025

मदत आणि बचाव कार्य सुरु

अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन बचाव पथक आणि अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचले आहे. विमानाची आग विझवण्याचे कार्य सुरु आहे. विमान जमिनीवर आदळ्याने आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सध्या विमानातील लोकांचा शोध सुरु आहे. परंतु अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अपघाताची चौकशी

दक्षिण कोरियाच्या नौदलाने अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नौदलाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये विमानातील चार जणांचा शोध सुरु असल्याचे नौदलाने म्हटले आहे. तसेच अपघाताचे खरे कारण सुनिश्चित करण्यासाठी तपास सुरु करण्यात आली असल्याचे म्हटले.

दक्षिण कोरियाच विमान अपघातांचे वाढते प्रमाण

गेल्या काही महिन्यांत दक्षिण कोरियामध्ये विमान अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेजू एअरच्या प्रवासी विमानाचा मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला होता. यामध्ये १८१ प्रवासी होते. या प्रशांमधील १७९ जणांचा मृत्यू झाला होता. विमानाच्या क्रू मेंबर्सचाही यात समावेश होता. दक्षिण कोरियात विमान वाहतुकीच्या अपघातांमध्ये हा सर्वात मोठा अपघात होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा झटका ; ‘लिबरेशन डे’ टॅरिफ निर्णयाला दिली स्थगिती

Web Title: South koreas navy plane crashes in pohang with 4 people on board

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • South korea
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम
1

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर
2

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
3

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
4

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.