Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमध्ये अंतर्गत गृहक्लेष; बलुचिस्तानमध्ये शालेय बसवर आत्मघातकी हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

एकीकडे पाकिस्तान भारतासोबतच्या तणावात अडकेलेला आहे. तर दुसरीकडे दहशतवादाला आश्रय दिल्यामुळे पाकिस्तान रोज एका संकटाचा सामना करत आहे. नुकतेच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बुधवारी एक आत्मघातकी हल्ला झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 21, 2025 | 01:40 PM
Suicide bomb attack in Balochistan, targeting School bus, 4 children killed

Suicide bomb attack in Balochistan, targeting School bus, 4 children killed

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: एकीकडे पाकिस्तान भारतासोबतच्या तणावात अडकेलेला आहे. तर दुसरीकडे दहशतवादाला आश्रय दिल्यामुळे पाकिस्तान रोज एका संकटाचा सामना करत आहे.  नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बुधवारी एक आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. एका शाळेच्या बसवर हा हल्ला झाला असून यामध्ये चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. आर्मी स्कूलच्या बसवर आत्मघाती बॉम्बरने हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे.

असोसिएडेट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार एका आत्मघातकी हल्लेखोरांनी आर्मी स्कूलच्या शाळेच्या बसला जोरदार धडक दिली. शाळेची बसला मुलांना घेऊन जात असताना स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने धडक दिल्याने भीषण स्फोट झाली. या स्फोटात चार मुलांचा मृत्यू झाला आहे. परंतु मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ३८ हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णलायता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प ही करु लागले युद्धाची तयारी? ताकदवान ‘गोल्डन डोम’ मिसाईल डिफेंस तयार करण्याची घोषणा

A suicide car bomber struck a school bus in restive southwestern Pakistan, killing at least four children and wounding 38 others, a government official said. https://t.co/WezYKZqikr

— The Associated Press (@AP) May 21, 2025

बलुचिस्तानच्या खुझदार जिल्ह्यात हा हल्ला झाला. दरम्यान हा हल्ला कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. परंतु बलोच सेपरेटिस्ट ग्रुपने हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी देखील बलुचिस्तान प्रांतातील सुरक्षा अधिकारी आणि नागरिकांना बलोच सेपरेटिस्ट ग्रुपने लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता.

बलुचिस्तानमध्ये वाढते आत्मघात हल्ले

गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अनेक आत्मघातकी हल्ले झाले आहे. दिवसेंदिवस हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये सुरक्षा अधिकारी आणि नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. तसे पाहिले तर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले, स्फोट नवीन नाहीत. परंतु २०२५ मध्ये सुरुवातीच्या काही काळातच या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर पाकिस्तानचे लष्कर आणि सरकार या हल्ल्यांना थांबवण्यात आणि कमी करण्यात अयशस्वी ठरत आहे. यामुळे बलुचिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानपासून वेगळे होण्याची मागणी केली आहे.

खैबर पख्तूनख्वा प्रांतातही हल्ले

बलुचिस्तानशिवाय पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातही हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे.  पाकिस्तानच्या काऊंटर टेररिझम डिपार्टमेंटने (CTD) सादर केलेल्या अहवालानुसार, खैबर पख्तूनख्वामध्ये १३७ दिवसांत तब्बल २८४ दहशतवादी हल्ले झाले आहेत. शिवाय खैबर पख्तूनख्वाच्या उत्तर वझिरिस्तान, बानू, डेरा, इस्माइल खान, पेशावर आणि कुर्रम हे भाग दहशतवाद्यांच्या विळख्यात अडकले आहेत. यामुळे खैबर पख्तूनख्वा देखील बलुचिस्तानच्या पावलावर पाकिस्तानपासून वेगळे होण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘PAK’ च्या तुकड्यांची सुरुवात? बलुचिस्तानसह खैबर पख्तूनख्वा देखील पाकिस्तानपासून वेगळे होण्याच्या मार्गावर?

Web Title: Suicide bomb attack in balochistan targeting school bus 4 children killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
1

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
2

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
3

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.