Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनिता विल्यम्स यांच्या परतीचा प्रवास पुन्हा लांबणीवर; नासाने पुढे ढकलली मोहीम, कारण काय?

गेल्या 9 महिन्यांपासून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानकात अडकल्या आहेत. सध्या त्यांच्या परत येण्याची तारिख पुन्हा लांबणीवर पडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 13, 2025 | 10:45 AM
Elon Musk's SpaceX spacecraft arrives at the ISS

Elon Musk's SpaceX spacecraft arrives at the ISS

Follow Us
Close
Follow Us:

नासा: गेल्या 9 महिन्यांपासून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानकात अडकल्या आहेत. त्यांच्या परत येण्यासाठी नासा एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत मिळून काम करत आहे. दोन दिवसांपूर्वी 16 मार्च रोजी दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार असल्याची अधिकृत माहिती नासाने जाहीर केली होती. मात्र, अंतराळवीरांची परत येण्याची योजना आणखी लांबणीवर पडली आहे.

तांत्रिक अडचणींमुळे रॉकेटचे उड्डाण होऊ शकले नाही

दोन्ही अंतरावीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचे फाल्कन रॉकेट चे 12 मार्च रोजी प्रक्षेपण होणार होते. मात्र, प्रक्षेपणादरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या यामुळे फाल्कन उड्डाण घेऊ शकले नाही. NASA ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्मच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Sunita williams : सुनीता विल्यम्सबाबत मोठी बातमी, ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार; नासाने तारीखही सांगितली

ISS वर 280 दिवसांपासून अडकलेले अंतराळवीर

सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टमधून ISS वर गेले होते. त्यांचा हा प्रवास फक्त 8 दिवसांचा होता. मात्र, बोईंगच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा प्रवास लांबला. स्टारलाईनरमध्ये हायड्रोजन गळती आणि थ्रस्टरच्या बिघडामुळे दोन्ही अंतराळवीरांना परत येण्यास विलंब झाला. नंतर सप्टेंबर 2024 मध्ये स्टारलाईनर रिकामे अवस्थेत पृथ्वीवर परत पाठवण्यात आले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ISS वरच राहिले.

एलॉन मस्क यांच्यावर अंतराळवीरांना परत आणण्याची जबाबदारी आणि बायडेनवर टीका

डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांच्यावर सोपवली आहे. ट्रम्प यांनी सुनिता विल्यम्सच्या परत येण्याच्या विलंबसाठी जो बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले आहेत. ट्रम्प यांनी म्हटले होते की, “मी मस्कला दोन्ही शूर अंतराळवीरांना परत आणण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी जो बायडेन यांच्यावर टीका करत, बायडेन प्रशासनाने त्यांना अंतराळातच सोडले असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या परत येण्यास विलंब होणार नाही अशी हामी देखील ट्रम्प यांनी दिली होती.

पुन्हा एकदा होणार लॉन्चिग

NASA नुसार, आता पुढील प्रयत्न 15 मार्च रोजी सकाळी 4:56 वाजता केला जाणार आहे. जर सर्व तांत्रिक अडचणी सोडवल्या गेल्या, तर स्पेसएक्सच्या मदतीने सुनीता आणि विलमोर यांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणता येईल.

सुनिता विल्यम्स यांची भावनिक प्रतिक्रिया 

दरम्यान सुनिता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्री अंतराळ स्थानकातून पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पृथ्वीवर त्यांच्या परत येण्यात पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “सगळ्यात कठीण बाब म्हणजे, पृथ्वीवरील लोकांना आमच्या परत येण्याबद्दल काही माहिती नाही. त्यांच्यासाठी हा एक भावनिक प्रसंग आहे. कदाचित आमच्यापेक्षाही जास्त.” हा त्यांच्यासाठी सर्वात कठीण काळ आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘हा सगळ्यात कठीण काळ…’; 9 महिन्यांपासून ISS वर अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांची भावनिक प्रतिक्रिया

Web Title: Sunita williams and butch wilmores return journey delayed again nasa postpones mission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • Sunita Williams
  • World news

संबंधित बातम्या

युद्ध विनाशाच्या अंतिम सीमेवर! युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आकडा उडवेल झोप
1

युद्ध विनाशाच्या अंतिम सीमेवर! युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आकडा उडवेल झोप

मॉस्कोच्या शत्रूंची उडाली झोप! S-400 घेऊन समुद्रात उतरली जगातील सर्वात ताकदवर रशियन युद्धनौका
2

मॉस्कोच्या शत्रूंची उडाली झोप! S-400 घेऊन समुद्रात उतरली जगातील सर्वात ताकदवर रशियन युद्धनौका

‘Caught in Providence’ फेम न्यायाधीश फ्रॅंक कॅप्रियो यांचे निधन; वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

‘Caught in Providence’ फेम न्यायाधीश फ्रॅंक कॅप्रियो यांचे निधन; वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा
4

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.