Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताला मोठा झटका; स्वित्झर्लंडने काढून घेतला ‘Most Favoured Nation’ चा दर्जा, कंपन्यांवर 10% जास्त कराचा भार

स्वित्झर्लंडच्या सरकारने भारताचा Most Favoured Nation (MFN) चा दर्जा काढून घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता देशात कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांना 1 जानेवारी 2025 पासून  10% जास्त कर भरावा लागणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 14, 2024 | 10:57 AM
भारताला मोठा झटका; स्वित्झर्लंडने काढून घेतला ‘Most Favoured Nation’ चा दर्जा, कंपन्यांवर 10% जास्त कराचा भार
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: स्वित्झर्लंडच्या सरकारने भारताचा Most Favoured Nation (MFN) चा दर्जा काढून घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता देशात कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांना 1 जानेवारी 2025 पासून  10% जास्त कर भरावा लागणार आहे. हा निर्णय स्वित्झर्लंड सरकारने भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर घेतला आहे. स्वित्झर्लंडने डबल टैक्स अवॉइडेंस ॲग्रीमेंट (DTAA) अंतर्गत भारताला MFN चा दर्जा दिला होता.

नेमकं कारण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, नेस्ले प्रकरणाशी संबंधीत भारताने दिलेल्या निर्णयामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय सर्वाच्च न्यायालयाने म्हटले होते की, डबल टैक्स अवॉइडेंस ॲग्रीमेंट (DTAA) केवळ तेव्हा लागून होईल जेव्हा इनकम टॅक्स कायद्यांतर्गत अधिसूचित केले जाईल. याचा परिणामार्थ, नेस्ले सारख्या परदेशी कंपन्यांना त्यांच्या नफ्यावर अधिक कर भरावा लागला.

यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की, परदेशी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आणि व्यक्तींना डबल टॅक्स भरावा लागू नये. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय उलटवला. नेस्ले ही स्वित्झर्लंडमधील कंपनी आहे. याचे मुख्यालय वेवे शहरात आहे. या पार्श्वभूमीवर स्विस सरकारने भारताला दिलेला MFN दर्जा काढून घेतला, यामुळे आता भारतीय कंपन्यांना स्वित्झर्लंडमध्ये जास्त कर भरावा लागेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India-China LAC agreement: भारत-चीन सीमावाद सोडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल; शांततेच्या नवीन पर्वाची तयारी

DTAA म्हणजे काय?

क्लिअर टॅक्सनुसार, डबल टैक्स अवॉइडेंस ॲग्रीमेंट (DTAA) हा  दोन देशांमधील एक करार आहे. याद्वारे देशातील कंपन्या किंवा व्यक्तींना एकाच उत्पन्नावर दोन्ही देशांमध्ये कर भरण्यापासून संरक्षण दिले जाते. यामुळे व्यापार अधिक सुलभ होतो.

Most Favoured Nation (MFN) म्हणजे काय?

जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणताही सदस्य देश दुसऱ्या सदस्य देशाला ‘Most Favoured Nation (MFN)’ दर्जा देतो. यामुळे व्यापारातील भेदभाव कमी होतो आणि देशांमधील आर्थिक संबंध सुलभ होतात. मात्र, काही विशेष कारणांमुळे किंवा सुरक्षा कारणास्तव हा दर्जा काढून घेतला जाऊ शकतो. जागतिक व्यापार संघटना ही युनायटेड नेशन्सची संघटना असून यामध्ये 164 देश या संघटनेचे सदस्य आहेत.

का आणि कसा काढून घेतला जातो MFN दर्जा ?

मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक व्यापार संघटनेच्या कलम 21B अंतर्गत, या मध्ये सदस्य असलेल्या कोणताही देश सुरक्षेच्या विवादाअंतर्गत हा दर्जा काढून घेऊ शकतो. या कलमानुसार, यासाठी अनेक अटी मान्य कराव्या लागतात. मात्र, प्रत्यक्षात हा दर्जा काढून घेण्यासाठी कोणतीही औपचारिक प्रक्रिया नाही.

2019 मध्ये भारताने पाकिस्तानचा MFN दर्जा काढला होता

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-कश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारताने 2019 साली पाकिस्तानचा MFN दर्जा रद्द केला होता. यानंतर पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर भारताने जास्त सीमा शुल्क लावले होते. स्वित्झर्लंडच्या निर्णयाचा भारतीय कंपन्यांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असून, भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील व्यापारसंबंधांवरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- “कॅनडाचे…” जस्टिन ट्रुडो यांची पुन्हा बदनामी; डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली

Web Title: Switzerland suspended indias most favored nation status know details nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 10:57 AM

Topics:  

  • india
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
3

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
4

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.