फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये दिर्घकाळापासून तणावाचे संबंध आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी दोन्ही देशातील सीमावाद सोडवण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या डिसेंबरच्या अखेरिस विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक गलवान खोऱ्यात 2020 मध्ये झालेल्या झटापटीनंतरची पहिली उच्चस्तरीय बैठक असेल. याआधी अशी बैठक डिसेंबर 2019 मध्ये झाली होती, जी संघर्षाच्या तीव्रतेपूर्वी झाली होती. अलीकडेच चीनने डेपसांग आणि डेमचोक या भागांमधून सैन्य माघारी घेतल्यामुळे या चर्चेच्या यशस्वी होण्याच्या शक्यता अधिक मजबूत झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही बैठक सीमावादावर व्यापक तोडगा काढण्यासाठी नवा मार्ग उघडू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- “कॅनडाचे…” जस्टिन ट्रुडो यांची पुन्हा बदनामी; डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली
सीमा विवादाचे कायमस्वरुपी निराकरण करण्यावर भर
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून LAC वर स्पष्टपणे योग्य तो मार्ग काढण्यावर भर देण्यात येणार आहे. यासठी विविध स्तरांवर चर्चा होणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. तर ही चर्चा सीमा विवादाचे कायमस्वरुपी निराकरण करण्यावर केंद्रित असेल. बैठकीचे निकाल ठरवतील की पुढील कोर कमांडर स्तराची बैठक कधी होईल. पेट्रोलिंग, बफर झोन आणि ताण कमी करण्यासाठी उपाययोजना यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल. यामुळे भविष्यात संघर्ष टाळता येईल.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
भारत-चीन तणावर कमी करण्यावर सातत्याने प्रयत्न सुरू
2020 नंतर भारत आणि चीनने सीमा तणाव कमी करण्यासाठी अनेक सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न केले आहेत. आगामी बैठक हे दोन्ही देशांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे मतभेद मिटवून परस्पर विश्वास वाढवण्यावर भर देईल. तसेच, सीमा विवाद व्यवस्थापनासाठी स्थिर आणि दीर्घकालीन व्यवस्था निर्माण करण्याची संधी देईल. भारत-चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरू शकते. जर सकारात्मक निष्कर्ष निघाले, तर सीमावादावर स्थायी तोडगा काढण्याचा मार्ग सुलभ होईल आणि शांततेचा नवा अध्याय सुरू होईल.
एस. जयशंकर
काही दिवसांपूर्वी एस. जयशंकर यांनी संगितले होते की, भारत-चीन मध्ये सध्या 75% वाद सोडवण्यात आले आहेत. त्यांनी म्हटले की, चीनसोबत सीमेवरील सैन्याच्या माघारीशिवाय अजूनही अनेक मुद्यांवर भारतासमोर आव्हाने आहेत. चीनसोबतचा भारतास इतिहास अडणींचा आहे. LAC करार वाद झाला असला तरी करोना महामारीच्या काळात चीनने सीमवेर सैनिक तैनात करुन उल्लंघन केले होते. यामुळे दोन्ही देशांत अजून तणाव वाढला.