Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Syria Crisis: सत्तापालटानंतरही सीरियात परिस्थिती गंभीर; अमेरिका, रशिया समोर ‘ही’ मोठी आव्हाने

सीरियामध्ये गेल्या काही दिवसांपासून बंडखोर गटांचा विद्रोह सुरू आहे. बंडखोरांनी हामा, होम्स, दारा, ही महत्त्वाची शहरे ताब्यात घेतल्यानंतर आता दमास्कामध्ये विद्रोही गटांनी कब्जा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2024 | 03:19 PM
Syria Crisis: सत्तापालटानंतरही सीरियात परस्थिती गंभीर; अमेरिका, रशिया समोर 'ही' मोठी आव्हाने

Syria Crisis: सत्तापालटानंतरही सीरियात परस्थिती गंभीर; अमेरिका, रशिया समोर 'ही' मोठी आव्हाने

Follow Us
Close
Follow Us:

दमास्का: सीरियामध्ये गेल्या काही दिवसांपासून बंडखोर गटांचा विद्रोह सुरू आहे. बंडखोरांनी हामा, होम्स, दारा, ही महत्त्वाची शहरे ताब्यात घेतल्यानंतर आता दमास्कामध्ये विद्रोही गटांनी कब्जा केला आहे. यामुळे संघर्ष एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. विद्रोही गटांनी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेतून हाकूलन लावले. त्यांना आणि त्यांच्या कुटूंबीयांना मॉस्कोमध्ये आश्रय देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विद्रोही गटांचे नेता आणि त्यांचे समर्थक आता सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत, मात्र हा मार्ग अनेक आव्हानांनी भरलेला आहे. तसेच अमेरिका, रशियासमोर देखील अनेक आव्हाने उभी आहेत.

विद्रोही गटांसमोरील आव्हाने

विद्रोही गटांच्या यशानंतरही देशातील स्थिरता प्रस्थापित करणे एक मोठे आव्हान बंडखोरांसाठी आहे. विद्रोही गटांना  जिहादी संघटनांसारखी ओळख मिळाली, तर त्यांना जागतिक पातळीवर मान्यता मिळणे कठीण होईल. विद्रोही गटांच्या नेत्यांनी असे संकेत दिले आहेत की, ते देश चालवण्यासाठी तत्पर आहेत, परंतु त्यांच्या नेतृत्वावर अजूनही संशय घेतला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशिया-इराणशी मैत्री, सौदीपासून दुरावा; सत्ताबदलानंतर सीरियातील समीकरणे बदलणार का?

अमेरिका-रशिया आणि इतर देशांवरील परिणाम

सीरियात विद्रोही गटांचे सत्तास्थापन झाल्यास हा बदल अमेरिका, रशिया, इराण तुर्की आणि इस्त्रायल या देशांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.दमास्कामधील सत्तापालटानंतर इस्त्रायलने गोलान हाइट्स या वादग्रस्त क्षेत्रात आपले सैन्य तैनात केले आहे. याशिवाय, रशियाने असद यांना आश्रय देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिका आणि रशियाच्या भू-राजकीय संघर्षाच्या छायेत, सीरियाचा पुन्हा विकास हा आव्हानात्मक ठरेल.

सीरियाचे भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

सत्तांतराच्या प्रक्रियेमुळे देशातील अस्थिरता अधिक वाढण्याची शक्यता आहे. नवीन नेतृत्व कसे असेल, कोणत्या गटांना सामील केले जाईल, आणि देशातील विविध गटांमध्ये एकता प्रस्थापित होईल का, सध्या याबाबत अनिश्चितता आहे. विद्रोही गटांचे नेते अबू मोहम्मद अल-जुलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे राज्य संस्थांचे कार्य विद्रोही गटांच्या देखरेखीखाली चालू ठेवले जाईल. यामुळे सीरियाचे भविष्य काय असे यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

लोकांची भूमिका

असद सरकारच्या पतनानंतर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून त्यांनी जुन्या “क्रांती ध्वजाचा” वापर केला, जो बशर अल-असद यांचे वडील हाफिज अल-असद यांच्या आधीच्या काळात वापरला जात होता. लोकांच्या या क्रांतीने देशातील आशा जागवल्या आहेत, मात्र या हालचालीतून स्थिर सरकार कधी आणि कसे स्थापन होईल, यावर अवलंबून आहे की, सीरियाचा भविष्यातील मार्ग कसा ठरेल.

सध्याच्या परिस्थितीत, सीरिया अनेक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्यांचा सामना करत आहे. जागतिक शक्तींच्या हस्तक्षेपामुळे हा संघर्ष अधिक गुंतागुंतीचा होत असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर सहकार्याची गरज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनावरून ‘या’ दोन ब्रिटीश भारतीयांचा किंग चार्ल्स यांनी प्रतिष्ठित सन्मान काढून घेतला

Web Title: Syria civil war crisis major challenges to face america russia and rebel groups also nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 10:39 AM

Topics:  

  • America
  • iran
  • Israel
  • Russia
  • Syria
  • world

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
3

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
4

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.