Syria orders women to full body cover up on beaches with conservative new dress code
दमास्कस: सीरियामध्ये असद सरकारच्या सत्तेनंतर विद्रोही गट हयात-तहरीर अल-शाम (HTS)या गटाची सत्ता स्थापन झाली आहे. या गटाचे प्रमुखे अल-जुलानी यांनी देशात बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. सांस्कृतिक बदला अंतर्गत त्यांनी एक नवीन नियम लागू केला आहे. यामध्ये महिलां आणि पुरुषांच्या कपड्यांसंबंधित नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आता महिलांना समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण कप़डे घालणे बंधनकारक असल्याचे सीरियाच्या नव्या सरकारने म्हहटले आहे.
सीरियाच्या नवीन सरकारच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय लोकांचे हित लक्षात घेऊन लागू करण्यात आल आहे. पर्यटन मंत्रालयाने यासंबंधी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी, जसेच की समुद्रकिनारे, तलाव अशा ठिकाणी पर्यटकांना आणि स्थानिकांनी पोहण्याचे पूर्ण कपडे घालावेत असे सीरियाच्या पर्यटक विभागाने म्हटले आहे.
सीरियाच्या मंत्रालयाने हा नियम पुरुषांसाठीही लागू केला आहे. पुरुषांना सार्वजनिक ठिकाणी शर्टलेस राहण्यास मनाई करण्यात आली आहे. स्विमिंग एरिया, हॉटेल लॉबी आणि फूड सर्व्हिस एरियाच्या ठिकाणी सुट देण्यात आली आहे.
सीरियाने लागू केलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे की, पुरुषांना समुद्रिकिनारा आणि स्विमिंग पूल क्षेत्राबाहेर, सार्वजनिक ठिकाणी शर्टलेस राहण्यास बंदी आहे. ट्रान्सपेरंट कपडेही घालण्यावर बंदी लागू करण्यात आली आहे.
मंत्रालयाने आदेशात स्पष्ट केले आहे की, पाश्चत्य शैलीतील स्विमवेअर आंतरराष्ट्रीय आणि प्रीमियम रिसॉर्ट्स किंवा ४ स्टार किंवा त्याहून अधिक हॉटेल्स आणि खाजगी समुद्रकिनाऱ्यांवर ही बंदी लागू होत नाही.
सध्या सीरियात इस्लामिक राजवटीचा प्रभाव वाढत आहे. सीरियाच्या अंतरिम सरकारचे अध्यक्ष अल-जुलानी यांनी मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधिती सविधानावर स्वाक्षरीही केली आहे. त्यांनी डिसेंबरमध्ये सीरियाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांनी सांगतिले की, सीरियासाठी नवीन संविधाना लागू करण्याची त्यांनी तयारी सुरु केली आहे.
यासाठी तीन वर्षांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. पुढील पाच वर्षात सीरियामध्ये निवडणुका घेण्याची घोषणा अल-जुलानी यांनी केली आहे. तसेच सीरिया देशात पर्यटन वाढवण्याचाही प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात सीरियावरील निर्बंध हटवण्यात आल्याने त्यांचा मार्ग सोपा झाला आहे.
गेल्या वर्षाच्या अखेरीस एचटीएस या विद्रोही गटाने सीरियावर हल्ला करत बशर-अल-असदच्या सत्तेचा शेवट केला. त्यानंतर सीरियात एच-टी-एसचे प्रमुख अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखाली नवीन अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली.