Musk-Trump Controversy: मस्क-डोनाल्ड ट्रम्प वादावर पडला पड्दा! ‘त्या’ पोस्टबद्दल व्यक्त केली खंत (फोटोसौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरु होता. परंतु आता एलॉन मस्क यातून माघार घेताना दिसत आहे. एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागितली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल धोरणावर मस्क यांनी टीका केली होती. यानंतर हा वाद सुरु झाला होता.
हा वाद इतका तीव्र झाला होता की, दोघेही सोशल मीडियावर उघडपणे एकमेकांना धमकी देत होते. एलॉन मस्क यांनी ट्रम्पवर अनेक घंभीर आरोप केले होते. मस्क यांनी ट्रम्प त्यांच्याशिवाय निवडणूक जिंकले नसेत असे म्हटले होते. याशिवाय त्यांनी सेक्स रॅकेटशी संबंध असलेल्या जेफ्री एपस्टिन फाईलमध्ये ट्रम्प यांचे नाव असल्याचाही दावा केला होता. परंतु त्यानंतर काही दिवसांनी मस्क यांनी ही पोस्ट डिलिट केली.
सध्या मस्क यांनी सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त करत आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मस्क यांनी म्हटले आहे की, ” गेल्या आठवड्यात मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल शेअर केलेल्या पोस्टबद्दल मला खंत आहे, आम्ही खूप पुढे गेले होतो.” अशी खंत मस्क यांनी व्यक्त केली आहे. या पोस्टवरुन दिसून येत आहे मस्क डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना मस्क सोबत संबंध सुधारण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे म्हटले आहे.
I regret some of my posts about President @realDonaldTrump last week. They went too far.
— Elon Musk (@elonmusk) June 11, 2025
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल विधेयकावर मस्क यांनी टीका केली होती. यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरु झाले होते. आश्चर्य त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून राजीनामा दिला. यानंतर ट्रम्प यांनी देखील मस्कवर निशाणा साधत त्यांना टेस्ला सारख्या कंपनींशी असलेले सर्व सरकारी कार्य रद्द करण्याची धमकी दिली.
तर मस्क यांनी ट्रम्प यांचा वेश्याव्यसायाशी संबंध असलेल्या जेफ्री एपस्टिन फाईलमध्ये ट्रम्प यांचेही नाव असल्याचा गंभीर आरोप केला. सध्या मस्क यांनी ही पोस्ट दिली असून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. सध्या यावादातून एलॉन मस्क माघार घेताना दिसत आहेत. परंतु ट्रम्प यांचा लमाग हटण्याचा कोणताही विचार नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे.